माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा 
 मुरूम (प्रतिनिधी) : उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात मेजर ध्यानचंदसिंग यांचा जन्मदिवस संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. भिलसिंग जाधव, प्रा. नारायण सोलंकर, डॉ .अविनाश मुळे, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. मुकुंद धुळेकर, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. रविंद्र गायकवाड, डॉ. संध्या डांगे, प्रा. दयानंद बिराजदार, आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी प्राचार्य डॉ. सपाटे यांनी बोलताना क्रीडा दिन सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे असे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनीनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. डॉ. रमेश आडे यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने