मराठा आरक्षण मागणीला धनेगावातून समर्थन

मराठा आरक्षण मागणीला धनेगावातून समर्थन
वलांडी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला समर्थन दर्शवित  देवणी तालुक्यातील धनेगाव येथील नागरिकांनी सरकारचा निषेध केला.
अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या केले. लाठीहल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. गावातून भव्य मोर्चा काढत छत्रपती शिवाजी
महाराज चौकात आंदोलन करुन प्रशासनाला निवेदन देण्यात आले.यावेळी शिवकुमार बिरादार, विष्णू बिरादार, पुंडलिक बिरादार, उपसरपंच कुमार पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब बिरादार, नरसिंग बिरादार, दयानंद बिरादार यांसह समाजबांधव व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक विष्णुदास गुट्टे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने