आधुनिक लहुजी सेनाच्या वतीने प्रदीप थोरात यांनी
गोरगरिबांना शासनाकडून मिळणाऱ्या राशनचा चालू असलेला काळाबाजार थांबवावा.गोरगरिबांना मिळणाऱ्या राशन धान्यावर प्रक्रिया करून मोठ्या भावामध्ये विक्री करणारा व्यवसाय लातूर जिल्ह्यामध्ये उभा करण्यात आले आहेत.हे बेकायदेशीर उद्योग त्वरित बंद करून हा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.आशा मागणीसाठी आमरण उपोषण प्रदीप थोरात यांच्या वतीने गेल्या चार दिवसापासून चालू आहे या उपोषणाला काँग्रेस प्रभाग क्रमांक 3 चे अध्यक्ष विकास कांबळे यांनी आज भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला.यावेळी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष नागिनताई सोमनाथभाऊ कांबळे,बसवंत आप्पा उबाळे, सरपंच सचिन मस्के,पंकज भाऊ काटे,काँग्रेसचे पक्षाचे परिवहन जिल्हा अध्यक्ष राम स्वामी,आनंदभाई वैरागे,अशोक देडे,अमर शिंदे,उमेश मस्के, मनोज तोडकर,प्रशांत मस्के,आधी समाज बांधव व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा