महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेची 26 वी वार्षीक सर्वसाधारण सभा

 महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेची

26 वी वार्षीक सर्वसाधारण सभा







लातूर - मराठवाड्यातील बँकींग क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करून नावलौकिक मिळविलेल्या महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेची 26 वी वार्षीक सर्वसाधारण सभा 24 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वा.जेएसपीएम संस्थेअंतर्गत येणार्‍या स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक सभागृह एमआयडीसी, लातूर येथे होणार आहे.
महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेची गेल्या पंचवीस वर्षापासून यशस्वी वाटचाल सुरू आहे. हे बँकेच्या कार्यावरून समोर आलेले आहे. बँकेच्या यशस्वी वाटचालीबद्दल महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेला राष्ट्रीयस्तरावरील अनेक पारितोषिके मिळालेली आहे. या बँकेची 26 वी वार्षीक सर्वसाधारण सभा 24 सप्टेबर 2022 रोजी होणार आहे.
या वार्षीक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी एमएनएस बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या वार्षीक सर्वसाधारण सभेमध्ये वेळेत परतफेड करणारे उत्कृष्ठ कर्जदार, ठेवीदार व खातेदारांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच मार्केट यार्ड शाखा, विवेकानंद चौक शाखा, अहमदपूर शाखा, शिरूर अनंतपाळ शाखा आदी शाखेतील 43 शाखा सल्‍लागार सदस्यांना पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत केले जाणार आहे.  त्यामुळे 24 सप्टेबर आज रोजी होणार्‍या या एमएनएस बँकेच्या वार्षीक सर्वसाधारण सभेला सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते यांनी केलेले आहे.

उत्कष्ठ काम करणार्‍या बीसीए एजंटाचाही होणार सन्मान
महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या व्यवसाय वृध्दीसाठी सक्रीयपणे व उत्कृष्ठपणे कार्य करणार्‍या बी.सी.एस.एजंटापैकी संतोष हारके, जालिंदर गिरी, शिवकांत सिद्राप्पा लुल्‍ले, महम्मद अमिरसाब शेख, संतोष नागनाथराव शिवणे, आंतेश्‍वर नागनाथ सुगावे या बीसीए एजंटांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून महाराष्ट्र नागरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच बँकेच्या पॅनलवरील विधी सल्‍लागार व बँकेच्या पॅनलवरील व्हॉल्युवेअर यांचा सत्कारही याच वार्षीक सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे. अशी माहिती बँकेचे कार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने