दसरा मेळाव्यास परवानगी मिळाल्याचा उस्मानाबादेत शिवसैनिकांचा जल्लोष

 दसरा मेळाव्यास परवानगी मिळाल्याचा शिवसैनिकांचा जल्लोष






उस्मानाबाद (प्रतिनिधी) - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला अखेर मुंबई येथील दादर विभागात असलेल्या शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास न्यायालयाने दि.२३ सप्टेंबर रोजी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे शिवसैनिकात जोश संचारला असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिठाईचे वाटप करीत फटाक्यांची आतषबाजी व प्रचंड घोषणा देत य शिवसैनिकांनी या विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास साजरा केला. दरम्यान, शिवसेना शिवतीर्थवर गेल्या ५६ वर्षापासून दसरा मेळावा घेत असलेली परंपरा न्यायालयाच्या निकालाने कायम राखली आहे.

शहर प्रमुख संजय पप्पू मुंडे, युवा सेना शहर प्रमुख रवी वाघमारे, माजी गटनेते सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, राणा बनसोडे, राजेंद्र घोडके, माजी शहर प्रमुख प्रवीण कोकाटे, दिपक जाधव, पंकज पाटील, निलेश शिंदे, संजय भोरे, वैभव वीर, अजित बाकले,शुभम कदम, पांडुरंग माने हनुमंत देवकते, राकेश सुर्यवंशी, हनुमंत यादव, बाळासाहेब पोतदार, ऍड. संदीप देशमुख, शिवप्रताप कोळी, राहुल भांडवले प्रदीप साळुंके, अमोल विभुते, अण्णा तेरकर, अक्षय खळदकर, सागर शेरकर, राकेश जाधव, शिरीष वाघमारे, जगदीश शिंदे, अक्षय जोगदंड, सत्यजित पडवळ, जगदीश माने, बापू देशमुख, सह्याद्री राजेनिंबाळकर, नरसिंग मिटकरी, योगेश जाधव आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

أحدث أقدم