'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या टेलिव्हिजन विभागाची राज्य कार्यकारिणी जाहीर उपाध्यक्षपदी निशांत भद्रेश्वर, तर संघटकपदी दीपरत्न निलंगेकर

 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या टेलिव्हिजन विभागाची राज्य कार्यकारिणी जाहीर  

उपाध्यक्षपदी निशांत भद्रेश्वर, तर संघटकपदी दीपरत्न निलंगेकर





लातूर / प्रतिनिधी-देशात तेवीस राज्यांत १८ हजार पत्रकारांना सोबत घेऊन देश पातळीवरील काम करणाऱ्या पत्रकारांच्या, पत्रकारितेच्या हितासाठी लढा देणाऱ्या 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या टेलिव्हिजन विभागाच्या पत्रकारांची राज्य कार्यकारिणी 'व्हॉईस ऑफ मीडिया' संघटनेच्या टेलिव्हिजन विभागाचे प्रदेशाध्यक्ष विलास बडे यांनी जाहीर केली आहे.
प्रदेशाध्यक्ष विलास बडे यांनी घोषित केलेल्या राज्य कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी लातूरचे एबीपी माझाचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांची, तर सह्याद्री दूरदर्शनचे प्रतिनिधी दीपरत्न निलंगेकर यांची संघटक म्हणून निवड केली आहे. उर्वरित कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्षपदी संदीप भुजबळ, पंकज दळवी, उपाध्यक्षपदी ऋत्विक भालेकर, अक्षय कुडकेलवार, दत्ता कानवटे सरचिटणीस विजय गायकवाड, सहसरचिटणीस गोविंद वाकडे, कोषाध्यक्ष  शैलेश तवटे, कार्यवाहक उमेश अलोने, कार्यवाहक राजू सोनवणे, संघटक अक्षय भाटकर, संघटक सागर सुरवसे, गणेश काळे, प्रवक्ता महेश तिवारी, प्रसिद्धी प्रमुख निकिता पाटील, सदस्य पदी कपील भास्कर, गौरव मालक, कुंडलिक काळढोके यांचा समावेश आहे.  
'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या माध्यमातून राज्यभरातील टेलिव्हिजन माध्यमांत काम करणाऱ्या सर्वांसाठी आम्ही काम करीत आहोत. येत्या दहा दिवसांत राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष घोषित केले जाणार आहेत. राज्याचे सर्व पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष यांची राज्य चिंतन बैठक येत्या मार्चमध्ये आयोजित केली जाणार आहे. टीव्हीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या भविष्यासाठी 'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या माध्यमातून एक पॉलिसी तयार करण्यात येणार आहे. त्या पॉलिसीच्या माध्यमातून शासन आणि राज्यातल्या टीव्हीचे प्रशासन चालवणाऱ्या प्रत्येकासाठी नियमावली ठरवून दिली जाणार आहे. याशिवाय 'व्हॉईस ऑफ मीडिया'ची पत्रकारांसाठी घर, आरोग्य, मुलांचे शिक्षण, स्कीलिंग आणि सेवानिवृत्तीनंतर काय, या पंचसूत्रीवरही काम केले जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष विलास बडे यांनी दिली. या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना 'व्हॉईस ऑफ मीडिया'चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, प्रदेशाध्यक्ष राजा माने, लातूर जिल्हाध्यक्ष बालाजी फड, सरचिटणीस संगम कोटलवार, कार्याध्यक्ष शहाजी पवार, सुशांत सांगवे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने