राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्य पोस्टर सादरीकरणाचे आयोजन

 राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्य पोस्टर सादरीकरणाचे आयोजन






मुरूम, ता. उमरगा, ता. २८ (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या सयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून पोस्टर प्रेझेन्टेशनचे मंगळवारी (ता. २८) रोजी आयोजन करण्यात आले. 
या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा परीक्षक म्हणून आदर्श कॉलेज ऑफ फार्मसी येथील प्राचार्य डॉ. श्रीराम पेटकर होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी कॉलेजचे डॉ. भगवंत व्हनाळे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. राजकुमार रोहीकर,  डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. संध्या डांगे, प्रा. प्रियंका काजले, प्रा. राजनंदिनी लिमये, डॉ. सुभाष हूलप्पले, डॉ. सुधीर पंचगल्ले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. पेटकर यांनी जागतिक स्तरावरील भारतीय वैज्ञानिकांचे योगदान याविषयी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित पोस्टर बनवताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायला हव्यात याविषयी डॉ. व्हनाळे यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. सुशील मठपती यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना सर सी. व्ही. रमण व त्यांचा नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठीचा प्रवास यावर प्रकाश टाकला. 
पोस्टर सादरीकरण स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध विषयांवर पोस्टर्सचे सादरीकरण केले. या स्पर्धेत बी.एस्सी. विभागातून कुमारी वैष्णवी भोसगे(प्रथम), अभिजित जामगे(द्वितीय) तर निकिता ब्याळेकुळे(तृतीय) क्रमांक पटकाविला तर फार्मसी विभागातून पुजा ख्याडे व अनुष्का पोतदार(प्रथम), प्रतीक्षा गायकवाड व दीक्षा डावले(द्वितीय)तर दिपाली कदारे(तृतीय) क्रमांक मिळविला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. सपाटे म्हणाले की, विज्ञान शाखेतील विद्यार्थी कसे असावेत आणि त्याची समाजाप्रती कर्तव्य कोणती असावीत. याकडे सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुजित मठकरी तर आभार डॉ. आप्पाराव सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजन व यशस्वीतेसाठी फार्मसी कॉलेजचे समन्वयक डॉ. रविंद्र आळंगे, डी. व बी. फार्मसीच्या विभागप्रमुख प्रा. दिपाली स्वामी, प्रा. योगेश पाटील, प्रा. सचिन राजमाने, प्रा. लखन पवार, प्रा. भूषण पातळे, अमोल कटके, कु. पुजा सगरे आदींनी प्रयत्न केले.

Post a Comment

أحدث أقدم