शेत तिथे रस्ता अभियानासाठी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन पुरस्कार

शेत तिथे रस्ता अभियानासाठी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन पुरस्कार
औसा - औसा मतदारसंघातील शेती विकासासाठी शेत तिथे रस्ता या अभियानातून सुमारे बाराशे किलोमीटर लांबीचे शेतरस्ते कामे यशस्वीपणे पूर्ण करून हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे.शेत रस्त्याचा औसा पॅटर्न म्हणून संपूर्ण राज्यात नावारूपाला आलेल्या या अभियानाची तसेच मनरेगातून ग्रामसमृद्धी या अभियानातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात केलेली फळबाग लागवड व शेतकऱ्यांच्या जनावरांना बांधून दिलेल्या गोठे आदी कामांची दखल घेऊन पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने आ. अभिमन्यू पवार यांना पुरस्कार जाहीर झाला होता. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार आ. अभिमन्यू पवार यांच्या पत्नी सौ. शोभाताई अभिमन्यू पवार यांनी स्वीकारला. 

                               पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या पुळूज (ता. पंढरपूर) आयोजित सहकारमहर्षी डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त (दि.७) सप्टेंबर रोजी शेतकरी, अधिकारी व पदाधिकारी गौरव सोहळ्यानिमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले. आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघातील शेत तिथे रस्ता, मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर केलेली फळबाग लागवड व जनावरांना गोठे बांधणी या कामासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी औसा भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष सुभाष जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

أحدث أقدم