शहिद वीर जवान सुरेश चित्ते यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर व वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न

शहिद वीर जवान सुरेश चित्ते  यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर व वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न


औसा प्रतिनिधी -औसा तालुक्यातील आलमला येथील श्री सार्वजनिक गणेश मंडळ, आलमला, माऊली ब्लड बँक, लातुर  व वसुंधरा प्रतिष्टान, लातूर   यांच्या संयुक्त विद्यमाने आलमला येथे  विविध कार्यक्रम घेण्यात आले. रक्तदान शिबिर व वार्क्षरोपण कार्यक्रम घेण्यात आला.  या शिबिरात एकूण 41 रक्तदात्याने रक्तदान केले. या  कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर चे
योगेश शर्मा  यांच्या हस्ते  आले.या कार्यक्रमास धनंजय निलंगेकर, मंडळाचे संथापक अध्यक्ष अँड .अमोल निलंगेकर , जनपथ शिक्षण संस्था, लातूर चे सचिव  अँड. संगमेश्वर पाटील, शालेय समिती अध्यक्ष शिवकुमार पाटील, व्हा.चेअरमन कपिल धाराशिवे, कैलास कापसे, मंडळाचे माजी अध्यक्ष विवेक निलंगेकर, अँड. संदिप पाटील, रवि कदम, शिवलिंग मामडे, माउली लोणारे यांनी भेटी दिल्या. या  मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील, ऊपाध्यक्ष अर्जुन कळबडे, कोषाध्यक्ष रितेश निलंगेकर, सचिव मोहन गिरी,  प्रभाकर जाधव,योगेश खिचडे, बाळू कुंभार, सर्व मंडळाचे सदस्य व त्याच्या मित्रमंडळींनी खूप परिश्रम घेतले.यावेळी गावातील तरूण, गणेश भक्त, रक्तदाते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने