विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण व आदर्श पुरस्काराचे वितरण

विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण व आदर्श पुरस्काराचे वितरण 




औसा-वेळोवेळी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारी शाळा  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली काजळे या ठिकाणी विघ्नहर्ता गणेश मंडळ चिंचोली काजळे यांनी आयोजित केलेल्या विविध स्पर्धा व त्या स्पर्धेमधील विजेते यांना बक्षीस वितरण करण्यात आले .त्याचप्रमाणे शाळेतील आदर्श आदरणीय मंडले सर यांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमाचेअध्यक्ष बाबाजी पाटील , प्रमुख पाहुणे म्हणून शाळा  व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमाकांत पाटील, उपाध्यक्ष किशोरमस्के, युवा नेतृत्व गोरे साहेब, साळुंखे साहेब व विघ्नहर्ता गणेश मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य उपस्थित होते शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक  चव्हाण सर यांनी अध्यक्षांचे स्वागत केले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमोल निकाळजे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी हुंडेकर सर ,चंदेले मॅडम ,देशमुख सर यांनी परिश्रम घेतले.यावेळी गणेश भक्त, विद्यार्थी,गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने