जमदाडे विचारमंचचे २०२२ चे राज्यस्तरीय कार्यनिष्ठ शिक्षक पुरस्कार जाहीर






जमदाडे विचारमंचचे २०२२ चे राज्यस्तरीय कार्यनिष्ठ शिक्षक पुरस्कार जाहीर
लातूर- कै.ॲड. देविदासराव जमदाडे प्रबोधन व विचारमंच लातूरच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या २०२२ च्या राज्यस्तरीय कार्यनिष्ठ शिक्षक पुरस्कारांची घोषणा  मंचचे अध्यक्ष डॉ. संतोष जमदाडे, मुख्य संयोजक डॉ.संजय जमदाडे आणि पुरस्कार समिती प्रमुख डॉ.राजशेखर सोलापुरे यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने केली.
 शिक्षण, प्रबोधन,विद्यार्थी विकास व समाज उपयोगी विविध कार्य निष्ठेने करणाऱ्या शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय कार्यनिष्ठ शिक्षक पुरस्कार यावर्षी डॉ.रणजीत जाधव, श्रीमती आशा फुंदे-कराड,डॉ.शैलजा बरुरे, डॉ.संभाजी पाटील, डॉ.दिलीप गुंजरगे, मुख्याध्यापक विलास सिंदगीकर,इस्माईल शेख,प्रा.धनश्री लिंबगावकर, डॉ.रत्नाकर लक्षट्टे,विमल मुदाळे, डॉ.चंद्रप्रभू जंगमे यांना घोषित करण्यात आले आहेत.
सदरील पुरस्कारांचे वितरण दिनांक ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे असे कै.ॲड. देविदासराव जमदाडे प्रबोधन विचारमंचच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم