दिवंगत नेते अॕड. एस.एस. पाटील व चद्रकांत कापसे यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त आलमला येथील विविध कार्यक्रम संपन्न.

दिवंगत नेते अॕड. एस.एस. पाटील व चद्रकांत कापसे यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त आलमला येथील विविध कार्यक्रम संपन्न.



औसा -तालुक्यातील आलमला येथील रामनाथ नगरातील श्री रामनाथ
गणेश मंडळ, लातूर येथील लातूर ब्लड बँक व  महिला भजनी मंडळ, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आलमला गावाचे दिवंगत नेते अॕड. एस.एस. पाटील व चद्रकांत कापसे यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त आलमला येथील विविध कार्यक्रम संपन्न. स्मरणार्थ रक्तदान शिबिर घेण्यात आले  व यात एकूण 35 रक्तदात्याने रक्तदान केले. कार्यक्रमाचे उद्घाटन लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व दैनिक ‘शुभ दिन’चे संपादक महादेव कुंभार यांच्या हस्ते व  संध्यकाळची गणपतीची आरती श्री अमर खानापुरे यांच्या हस्ते करण्यात  आली. 
या कार्यक्रमास आर्ट ऑफ लिविंग चे केदार गाजरे, डॉ.अमर धाराशिवे, श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बसवेश्वर धाराशिवे, रामनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॕड. उमेश पाटील, महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक संघाचे मराठवाडा सचिव श्री प्रभाकर कापसे, सरपंच कैलास निलंगेकर, भाजप युवा उपाध्यक्ष कमलेश निलंगेकर, तंटामुक्ती अध्यक्ष विरभद्र बेरुळे, पी. सी. पाटील, राम कांबळे, संगमेश्वर पाटील,  तर आभार प्रदर्शन कैलास निलंगेकर (सरपंच) यांनी केले. 
आवाहन रामनाथ गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री कैलास कापसे, सचिव अप्पासाहेब आडसुळे, आबासाहेब लांडगे, खंडू मस्के, दत्ता राऊत व सर्व मंडळाचे सदस्य,  श्री शंकर धाराशिवे, उद्धव जडगे, आदम फाजल, प्रविण जगदाळे, महादेcgव मगर,  अण्णासाहेब गायकवाड, खादर वडवळे , विशाल निलंगेकर, राजु गुंजीतकर, महेश पाटील व त्याच्या मित्रमंडळींनी खूप परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم