सन 2020-21 व 2021-22 अंगर्तत महाविद्यालय स्तरावर प्रलंबित शिष्यवृत्ती प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत

             सन 2020-21 व 2021-22 अंगर्तत महाविद्यालय स्तरावर प्रलंबित

शिष्यवृत्ती प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत

           लातूर- लातूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना या नोटीसीव्दारे अंतिम सूचना देण्यात येते की, भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती सन 2020-21 व सन 2021-22 अंतर्गत महाविद्यालय स्तरावर प्रलंबित नमूद वर्षातील शिष्यवृत्ती प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत. ज्या विद्यार्थींचे प्रस्तावामध्ये त्रुटी आहेत असे प्रस्ताव विद्यार्थी लॉगीनला परत करुन प्रलंबित प्रस्तावातील त्रुटी वेळेत पुर्ण करुन घ्यावी.

            सदर बाबतीत केंद्र सरकारचे Pfms हे पोर्टल बंद करण्यात येत असून प्रलंबित शिष्यवृत्ती प्रस्तावामुळे विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहील्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालय व विद्यार्थ्यांची राहील याची गांर्भीयाने नोंद घ्यावी असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण एस.एन. चिकुर्ते यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

        जास्तीत जास्त प्रस्ताव प्रलंबित असलेल्या महाविद्यालयांचे नांवे पूढील प्रमाणे आहेत. सोनी नर्सिंग कॉलेज, लातूर, जवळगे नर्सिंग कॉलेज लातूर, न्यु व्हिजन नर्सिंग कॉलेज,लातूर, वसंतराव काळे होमियोपॅथीक कॉलेज लातूर व इतर असे एकूण 161 महाविद्यालयाकडे एकूण 434 प्रस्ताव प्रलंबित आहे. सन 2021-22 मधील अर्ज सद्यस्थिती- पात्र अर्ज 12 हजार 953 महाविद्यालयस्तरावर प्रलंबित अर्ज 346 व मंजूर अर्ज संख्या 12 हजार 607 असे आहेत.

Post a Comment

أحدث أقدم