निलंगा/प्रतिनिधी-शहरातील महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयांमध्ये एम्प्लॉयबिलिटी कार्यशाळेचे भव्य दिव्य उद्घाटन करण्यात आले.या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.एस.एस.पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यशाळेचे ट्रेनर म्हणून आलेल्या पुणे येथील अस्पायरिंग करिअरच्या डॉ.प्रिया जगताप मॅडम यांचे यावेळी स्वागत करण्यात आले.हि कार्यशाळा चार दिवस असणार आहे या कार्यशाळेत मध्ये नॅकच्या नियमानुसार घेण्यात येत आहे.
यामध्ये महाविद्यालयातील बी व एम.फार्मसीच्या विद्यार्थ्यांना सखोल माहिती देण्यात येणार आहे.याप्रसंगी प्रा.सुनिल गरड यांनी या कार्यशाळेत आपण काय काय शिकणार आहोत.याकार्यशाळेत स्किल डेव्हलपमेंट , एम्प्लॉयबिलिटी, कम्युनिकेशन स्किल्स,आदी.या कार्यशाळेत शिकायला मिळणार आहे.या बद्दल आपल्या मनोगतात सांगितले.या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा.शेख इर्शाद यांनी केले.ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्यडॉ.एस.एस.पाटिल तसेच प्रा.डाॅ.सी.वी.पांचाळ,प्रा.डाॅ.शरद उसनाळे,प्रा.डाॅ.माधव शेटकार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यशाळेचे सुत्रसंचलन बी.फार्मसी द्वितीय वर्षात शिकणारी विद्यार्थीनीं कु.प्रतिक्षा मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.सुशांत माचपल्ले यांनी मानले.
إرسال تعليق