दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि.19(जिमाका):- भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय विकलांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यासाठी शालांपूर्व शिष्यवृत्ती, शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रिक) शिष्यवृत्ती आणि उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (www.scholarship.gov.in) वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांनी केले आहे.
या शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी शालांतपूर्व शिष्यवृत्ती दि.30 सप्टेंबर 2022 पर्यंत नोंदणी, दि.16 ऑक्टोंबर 2022 पर्यंत पडताळणी आणि शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रिक) शिष्यवृत्ती दि.31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत नोंदणी दि.15 नोव्हेंबर 2022 पर्यंत पडताळणी तसेच उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती दि.31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत नोंदणी दि.15 नोव्हेंबर 2022 पर्यंत पडताळणी या कालावधीत केली जाणार आहे.
तेव्हा दिव्यांग विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (www.scholarship.gov.in). या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असेही आवाहन श्री. चौगुले यांनी केले आहे.
إرسال تعليق