शारदा सेमी विद्यालयात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरा
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील होते. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध गीतांवर नृत्य सादर करून उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांची मने जिंकली. यावेळी मुख्याध्यापक लक्ष्मण पुरी उपस्थित होते. शिक्षिका गीतांजली गिरी यांनी विद्यार्थ्यांना विविध गोष्टींच्या माध्यमातून श्रीकृष्ण जन्माची माहिती सांगितली. सूत्रसंचालन रेणुका समुद्रे यांनी केले. प्रास्ताविक वर्षा कांबळे यांनी केले. आभार कांचन देवधर यांनी मानले.

إرسال تعليق