गुणवत्तेच्या क्षेत्रात बौध्दिक संपदेच्या जोरावर जगावर राज्य करू- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 गुणवत्तेच्या क्षेत्रात बौध्दिक संपदेच्या जोरावर जगावर राज्य करू- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर



लातूर -कुठल्याही क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढलेली आहे. परंतु अशा स्पर्धेच्या युगातही सर्वाधिक हुशार तरूण आपल्या भारत देशातील आहेत आणि सर्वाधिक बेकारीही आपल्याच देशात आहे. परंतु ही परिस्थिती आपल्या येथील शिक्षणपध्दतीवर अवलंबून आहे. त्यामुळे अध्यात्म, विज्ञान व व्यावसायीकतेवर आधारित शिक्षण स्वीकारून गुणवत्तेच्या क्षेत्रात बौध्दिक संपदेच्या जोरावर जगावर राज्य करू असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा  राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.यावेळी राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ, महाराष्ट्र यांच्यावतीने कल्पतरू मंगल कार्यालय,दत्त मंदिर, औसा रोड,लातूर येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा वितरण समारंभात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय गोंधळी समजा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव नवरखेले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रभाकरराव इगवे, राष्ट्रीय गोंधळी समाजसेवा संघाचे राज्य सचिव सखाराम धुमाळ, राज्य उपाध्यक्ष  मुबंई ,डॉ.रमेश वेले अकोला, धाराशिव जिल्ह्याचे कारागृह अधिक्षक दिगंबर इगवे, लातूरचे नायब तससिलदार राजेश जाधव, उदगीरचे नायब तहसिलदार प्रकाश धुमाळ, निलंगा येथील सब रजिस्टार अशोक शिंदे, राष्ट्रीय गोंधळी समाजसेवा संघ महाराष्ट्रचे संयोजक राजेश भांडे, काशीनाथ इगवे, बाळासाहेब सूर्यवंशी, गणेश काळे, बालाजी भिसे, मधुकर घोडके, प्रशांत काटे, बाबासाहेब काटे, विक्रम पाचंगे, संजय नवरखेले, विवेकानंद चिंचोले, प्रेमानंद उबाळे, संतोष घोगरे, दत्तात्रय काळे, विलासराव बडगे, प्रभाकर घोडके, मधुकर घोडके,बबनराव काळे,आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, गोंधळी समाजाचा सन्मान करणारा कार्यक्रम आहे. मी कुलस्वामीनी तुळजाभवानी भक्त आहे. दररोज मी भगवान शंकराजी पूजा केल्याशिवाय पाण्याचा एक थेंबही ग्रहण करीत नाही. आर्यवीर दलाचे अध्यक्ष देवव्रत्तजी आचार्य यांच्या र्मादर्शनाखाली योग साधना करण्याचे काम करतो. राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचे विचार ऐकतो. ब्रम्हदेवाचा पुत्र भगवान कश्यप व परशुराम हे गोंधळी समाजाचे गुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरकार मध्ये सीआयडीचे कामही गोंधळी समाजच करायचा. त्यामुळे या समाजातील तरूणांनी आजही बाह्य बाबीपेक्षा ज्ञान, चारित्र्य व समाज उभारणी या कृतीवर भर देऊन आपली यशस्वी वाटचाल करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल 38 वर्षानंतर सीबीसीएस शिक्षणपध्दती लागू करून त्याची अंमलबजावणी सुरू केली. तसेच लोकहिताच्या 42 योजना अंमलतात आणून देशाचा चौफेर विकास करण्याचे काम केले. त्यांच्या या कार्याबद्दल जगातील 13 राष्ट्रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक विशेष पदक देऊन गौरव केला. यामध्ये तीन मुस्लीम राष्ट्रांचा समावेश आहे. त्यामुळे 21 व्या शतकात भारत जगाचे नेतृत्व करेल ही स्वामी विवेकानंदानी केलेली भविष्यवाणी खरी ठरेल. असे मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तुळजापूरची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा संयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच 10 वी 12 वी व पदवी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या 20 गुणवंतांचा व विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविणार्या व्यक्तिंना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक राजेश भांडे यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार  सूत्र संचलन  विवेकानंद चिंचोले, राजेश भांडे यांनी केले .तर आभार प्रभाकर घोडके यांनी मानले.गोंधळी समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी शासनाकडे पाठपूरावा करू राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्राच्या वतीने विद्यार्थ्यांना एन.टी.चे प्रमाणपत्र काढण्यासाठी 1961 चा पुरावा मागितला जातो. परंतु हा पुरावा बर्याच समाजबांधवाकडे नाही. त्यामुळे त्यांना नोकरीसाठी अडचणी येत आहेत म्हणून ही अट रद्द करून गोंधळी समाजाला न्याय देण्यासाठी शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करू असे आश्वासन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
पुस्तक मस्तकात गेले तर कुणाचे हस्तक होण्याची गरज नाही
- प्राचार्य शिवाजीराव नवरखेले
एन.टी.प्रवर्गामध्ये 62 जाती असून या जातीसाठी 2.5 टक्के रिजर्वेशन आहे. यातही गोंधळी समाज हा काटावर आहे. 100 जागा निघाल्या तर 2 जागा गोंधळी समाजाच्या वाट्याला येतात.  आम्ही जनदाग्नि ऋषिचे पुत्र परशुराम यांचे वारस आहोत. तरीही त्याला समाजमान्यता नाही. देवीच्या मंदिरात ब्राम्हण अन् दारात आम्ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच केंद्रात राज्य घटनेत एस.टी, एन.टी आणि ओबीसीला स्थान नाही. त्यामुळे गुणवत्तेच्या जोरावर प्रगती करणे गरजेचे झाले आहे. गुणवत्तेच्या आधारे पुस्तक मस्तकात गेले तर कोणाचे हस्तक होण्याची आयुष्यात गरज पडणार नाही. त्यामुळे स्वाभीमानाने जगायचे असेल तर कष्टाची भाकरी निर्माण करा आणि यशोशिखर गाठण्याचा प्रयत्न करा, यश निश्चित मिळेल असे भावनिक आवाहन राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नवरखेले यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم