सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांच्या घराच्या वास्तुशांती दिनी दिला माझे कुटूंब, माझी जबाबदारी



लातूर-आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस हा पैशाच्या पाठीमागे इतका लागला आहे की तो आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देईनासा झाला आहे. माणसाला रोजच्या जीवनात पैशाची नितांत गरज आहे पण किती प्रमाणात याला देखील मर्यादा आहे. खरं जर बघितल तर खरी संपत्ती आपले आरोग्यच आहे. पैसे कमविणे सोपे आहे. घर बांधणे सोपे आहे. गाडी घेणे सोपे पण आरोग्य कमविणे सर्वात अवघड आहे. जो आरोग्य कमवेल तोच निरोगी जीवन जगेल, आनंदात जगेल, माणसाच्या बुध्दीला असे वाटते की पैसा हे सर्वकाही आहे परंतू तसे नसून जर तुमचे आरोग्य चांगले नसेल तर तुम्हाला त्या पैशाचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे न चुकता सकाळी 5.30 वा. उठून व्यायाम करणे गरजेचे आहे. आळस न करता सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज जे आपण 3 टाईम जेवण करतो त्या जेवणा माध्यमातून म्हणाव्या तितक्या प्रमाणात पोषक घटक मिळत नाही. व दररोजचे ताण-तणाव व व्यवहारिक जीवनातील खर्च त्यामुळे आपले आयुष्य कमी होत चालेले आहे. जर आपले आयुष्य वाढवायचे असेल तर विषमुक्त अन्न, योग्य व्यायाम, योग्य विचार, योग्य संस्कार याची संगत घालण्याची गरज आहे असे विचार सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
हा विचार ध्यानी-मनी धरून सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी आपल्या घराच्या वास्तुशांतीनिमित्त आलेल्या प्रत्येकांना सकाळी 5.30 वाजता उठून व्यायाम करण्याचे आवाहन व सेल्फी फॉईंटच्या माध्यमातून मान्यवरांना वचनबध्द करण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला. याप्रसंगी सर्वांनी या सेल्फी पॉईंटवर थांबुन माझे आरोग्य माझी जबाबदारी या संकल्पनेला उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिलेला पहायला मिळाला. यावेळी राजुळे परिवाराच्यावतीने आलेल्या प्रत्येक  मान्यवरांना स्वामी विवेकानंद संक्षिप्त चरित्र व विचारधन हि पुस्तिका देण्यात आली.
        कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लातूरचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नागनाथ गीते, डॉ.धर्मवीर भारती, सामाजिक कार्यकर्ते अनिल पुरी, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे, भाजप युवा मोर्चा औसा तालुका अध्यक्ष धनराजप्पा परसणे, दैनिक पुण्यनगरीचे ब्रह्मानंद आचार्य, प्रदिप आचार्य, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष लहूकुमार शिंदे, राष्ट्रपती पुरस्कृत उमेश खोसे, सामाजिक कार्यकर्ते सुपर्ण जगताप, गंगाधर डिगोळे, बालाजीआप्पा पिंपळे, जितेंद्र पाटील, जोशीज् श्रीनिवास संकुलचे मालक योगानंद जोशी, प्राचार्य मद्दे सर, रामदास माने, रविकिरण सूर्यवंशी, साईनाथ घोणे, गुट्टे सर, संभाजी तांदळे, दत्तात्रेय सोनवणे, जितेंद्र सराफ, सुनील ताडमडगे, अमोल घायळ, सुनील ईबितदार, जिल्हा माहिती कार्यालयातील श्रीमान विवेक सर, बेग सर, वाठोरे सर, जिल्हा बातमीचे रोडगे सर आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم