तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सोमवंशी तर उपाध्यक्षपदी संपते यांची निवड

        तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सोमवंशी  तर                             उपाध्यक्षपदी संपते यांची निवड




औसा (प्रतिनिधी)-औसा तालुक्यातील हिप्परसोगा येथील तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी बालासाहेब सोमवंशी (दाजी ) तर उपाध्यक्षपदी राम संपते यांची निवड करण्यात आली.तंटामुक्त गाव समितीचे पदाधिकारी निवडण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली.या बैठकीत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.या बैठकीस लातूर जिल्हा बँकेच्या संचालिका तथा हिप्परसोगा सोसायटीच्या चेअरमन स्वयंप्रभा पाटील, ग्रामसेवक धनश्री माळी,अतुल पाटील,हेमंत पाटील,पोलीस पाटील बालाजी कांबळे,तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विठ्ठल सोमवंशी,नागोराव आळंदकर, मनोज सोमवंशी,छत्रभुज सोमवंशी,समाधान कांबळे,छगन कांबळे,ज्ञानेश्वर आळंदकर, सुशील सोमवंशी,आत्मा संपते, उद्धव यादव,भगवंत यादव यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم