माऊली विद्यालयाचा श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव उत्साहात संपन्न

 माऊली विद्यालयाचा श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव उत्साहात संपन्न

लातूर / प्रतिनिधी -  शहरातील आंबेजोगाई रोड वरील माऊली बालक मंदिर ,माऊली विद्यार्थी विकास केंद्र व माऊली इंटरनॅशनल मॉडेल  स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गोकुळाष्टमी व दहीहंडी चा सुंदर कार्यक्रम विद्यालयात आयोजित केला. या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्मला या गीतावर एक आकर्षक असे नृत्य सादर केले या नृत्यामध्ये श्रीकृष्णाच्या जीवनातील जन्म उत्सव,नटखट बालकृष्ण लीला , दहीहंडी व राधाकृष्ण रासलीला असे विविध दृश्य नृत्या मधून सादर केले . कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण प्रतिमा पूजनाने तर समारोप श्रीकृष्णाच्या आरतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव  गंगाधर आरडले सर यांनी केले आभार व सूत्रसंचालन भाग्यश्री उबाळे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष तानाजी बेवनाळे पाटील  विद्यालयाच्या प्राचार्या सौ.कविता आरडले मॅडम, उपप्राचार्या  काळे मॅडम , संपूर्ण शिक्षक वृंद पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात विद्यालयातील क्रिएटिव्ह टीमने दहीहंडी व सुंदर डिस्प्ले बोर्ड डिझाईन, राधाकृष्ण बाहुल्या तयार करून उपस्थितांची मने जिंकली.


Post a Comment

أحدث أقدم