मालमत्ता कर आणि पाणीपट्टी एकत्र मनपाचे ॲप आणि वेबसाईट

    लातूर/प्रतिनिधी:लातूर शहर महानगरपालिकेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या मागणी बिलातच पाणीपट्टीचाही समावेश केला आहे.याशिवाय नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र प आणि वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.मनपाकडून मालमत्ता कराची मागणी बिले वाटप करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच मनपाने मालमत्ता करासोबतच पाणीपट्टी कर एकत्रित करून बिले वाटप करणे सुरू केले आहे.या यासंदर्भात नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी संबधित झोन मध्ये तक्रार करावी.वसुली बिले घेऊन येणाऱ्या लिपिकाकडेही तक्रार करता येऊ शकते.त्यानुसार तक्रार अर्जाची दखल घेऊन स्थळ पाहणी करून पाणीपट्टी बिलामध्ये दुरुस्ती करता येईल.महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी Latur propeety tax हे स्वतंत्र प तयार केले आहे.हे प गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करता येते.या पमध्ये मालमत्ता करा संबंधी सेवा उपलब्ध आहेत. आपले मालमत्ता कराचे बिल पाहून ते त्यातून डाऊनलोड करता येते.मालमत्ता कराचा व इतर करांचा भरणा करणे व बिल भरल्यानंतर त्याची पावती डाउनलोड करता येते.यासोबतच मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी पालिकेने www.propertytax.mclatur.in ही वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.या सेवांचा वापर करून नागरिकांनी आपल्याकडील थकीत व चालू बिलाचा भरणा करून सहकार्य करावे,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم