पोळा सण मुक्तांगण च्या चिमुकल्यांनी केला साजरा

 लातूर/प्रतिनिधी: विशाल नगर येथील साई मंदिर समोरील मुक्तांगण इंग्लिश स्कूल मध्ये चिमुकल्यांनी बैलपोळा सण उत्साहात साजरा केला. प्रथम शाळेच्या आवारात शाळेच्या प्राचार्या सुमेरा शेख यांच्या हस्ते बैलांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेच्या शिक्षिका सुखदा कुलकर्णी यांनी बैल पोळा सणाविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली, पोळा सणाचा शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात, बैल सजवितात व मिरवणुकीत भाग घेतात. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो हे त्यांनी सांगितले. सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेच्या शिक्षिका शितल बिरादार यांनी केले, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

أحدث أقدم