साखळेवाडी व उंबर्डी येथील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि कडापे भवानीमाता मंदिर कामाचा जिर्णोद्धार संपन्न


 साखळेवाडी व उंबर्डी येथील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि कडापे भवानीमाता मंदिर कामाचा जिर्णोद्धार संपन्न



       बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) शिवसेना विधीमंडळ पक्ष प्रतोद तथा आमदार भरतशेठ गोगावलेयांच्या हस्ते कडापे येथील भवानीमंदिर जिर्णोध्दार १७ लक्ष रुपये कामाचा शुभारंभ तसेच जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत उंबर्डी पाणीपुरवठा योजना -५५६७८०/ रुपये साखळेवाडी पाणी पुरवठा योजना -९१३०२७१/-रुपये यां विकासकामांचे भूमीपूजन संपन्न झाले. 
       या प्रसंगी शिवसेना उपतालुका  नितीन पवार, द. रायगड युवासेना उपजिल्हाधिकारी अविनाश नलावडे, माणगाव तालुक युवासेना अधिकारी राजेश कदम, शिवसेना निजामपूर विभागप्रमुख मनोज सावंत, जेष्ट कार्यकर्ते गणेश समेळ, सुधीर पवार, भागड ग्रामपंचायत सरपंच प्रकाश जंगम, कोंडू फाळके, पंढरीनाथ उत्तेकर, ज्ञानेश्वर उत्तेकर, रवी जंगम, मंगेश सावंत, रमेश दबडे, सखाराम दबडे, प्रदीप पवार, संजय पवार आणि निजामपूर विभागातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
       यावेळी आमदार गोगावले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. माणगाव तालुक्यात आणि निजामपूर विभागात पाणीपुरवठा योजनाचे श्रेय घेण्याचा विरोधक केविलवणा प्रयत्न करत आहेत, आम्ही आणलेल्या कामाचे श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये दुसऱ्यांनी आणलेल्या कामाचे  श्रेय आम्ही घेणार नाही असा खोचक सला देत सध्या निजामपूर विभागात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना बाबत विरोधकांना खडे बोल सुनावले. प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी कडापे ग्रामस्थांनी आमदार भरतशेठ गोगावले करत असलेल्या या विकास कामाबद्दल निजामपूर विभागातील ग्रामस्थांनी विशेष आभार मानले.

Post a Comment

أحدث أقدم