तांबरवाडी येथे शेतकरी राजाचा बैल पोळा सण केला मोठ्या उत्साहात साजरा

 तांबरवाडी येथे शेतकरी राजाचा बैल पोळा सण केला मोठ्या उत्साहात साजरा

लामजना प्रतिनिधी-दरवर्षी बळीराजाा पारंपारीक उत्साहाने ढोल ताशाच्या गजरात शेतकर्‍याच्या सुखा दुखात सदा सहभागी अस
लेले त्यांचे शेतातील सोबती बैल .गाय यांचा पारंपारीक विवाह सोहळा करुन बैल पोळा  सण साजरा करतात ,याच बैल पोळा सणाचा जल्लोष करत आज तांबरवाडी येथील शेतकरी सुग्रीव लोंढे व दिपक बिराजदार यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला .दरवर्षी श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते तर त्या श्रावणात पिठोरी अमावस्येला बैलपोळा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण. कर्नाटक आणि महाराष्ट्रात त्याला बैलपोळा किंवा बेंदूर म्हणतात कर्नाटकाच्या काही भागात करुनुर्नामी म्हणतात.
या दिवशी बैलांना शेतकरी भल्या पहाटे आंघोळ घालतात त्यांना खूप सजवतात घरात पुरणपोळी, कोंडबळे, कापणी,  असे विविध गोड पदार्थ बनवले जातात.बैलांकडून या दिवशी कष्टाचे कोणतेही काम शेतकरी करून घेत नाही.बैलांबरोबरच इतर जनावरांनाही सजवले जाते. सर्व जनावरांना पुरणपोळी बनवली जाते.काही दाण्यांची खिचडी ही (घुग-या), पुरण पोळी बरोबर जनावरांना देतात. या दिवशी सर्व जनावरे खूप आनंदात असतात त्यांच्याकडे महिला येतात आणि मातीच्या बैलाची पूजा करतात.फार पूर्वीपासून शेतीतील सर्व कष्टाची कामे बैल करतात बैलाविषयी अनेक कथा कविता चित्रपट आणि लेखही प्रसिद्ध आहेत.या बैल पोळा बेंदूर सणाच्या निमित्ताने प्राण्याविषयी आपल्या मनात प्रेम आणि आपुलकी वाढते. ते आपण चिरंतन ठेवूया शेतीला पूरक व्यवसाय पशुपालन आहे. आपण सर्वांनी त्यांचे महत्त्व समजून घेऊ यात आणि त्यांना त्रास न देता नेहमी आनंदी ठेवूया.तर मित्रांनो पोळा या विषयावर बोलणार आहोत याच्याबद्दल माहिती घेणार आहोत म्हणजे बैलपोळा काय असतो? आणि कसा साजरा केला केला जातो महाराष्ट्र ते आज मी तुम्हाला सांगतो मित्रांनो बैलपोळा हा एक महाराष्ट्रातील सण आहे किंवा बैल पोळा श्रावण अमावास्या साजरा करण्यात येणार आहे कृतज्ञता व्यक्त करणारा एक मराठी सण आहे ज्यांच्या करण्यासाठी साजरा करण्यात येतो हा सण श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो या दिवशी शेतकरी बैलाची पूजा करतात.बैलांना आराम मिळतो शेतकरी या सणाला उत्साही असतात ते बैलांना नदीवर किंवा ओढ्यावर,तळ्यावर आंघोळ घालतात त्यांना चारा देतात बैलांच्या अंगावर झुले  घालतात व त्यांना सजवतात बैलांना अन्नाचा नैवेद्य दिला जातो सायंकाळी सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढली जाते व त्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात हा सण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण आहे या दिवशी प्रत्येक घरात पुरणपोळी केली जाते. असा  पारंपारीक पद्धतीने साजरा होणारा सण तांबरवाडीतही मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसला.

Post a Comment

أحدث أقدم