सक्षमीकरण उपक्रमात लातूर महिला काँग्रेस प्रतिनिधींचा सहभाग जिल्हयातील महिलांना न्याय वाहिनीची मदत मिळवून देणार

सक्षमीकरण उपक्रमात लातूर महिला काँग्रेस प्रतिनिधींचा सहभाग

            जिल्हयातील महिलांना न्याय वाहिनीची मदत मिळवून देणार  


लातूर - :  स्थानिक स्वराज्य संस्थांमधून महिलांना आरक्षण देऊन त्यांना सनमान मिळवून देणारे देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या जयंतीचे औचीत्त्य साधून अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वतीने दिल्ली येथे आयोजित केलेल्या महिला राजकीय सक्षमीकरण उपक्रमात लातूर येथील महिला काँग्रेस शिष्टमंडळाने सहभाग घेऊन दूरदृष्टी नेतृत्वाला आदरांजली अर्पन केली. त्यांचा विचार पूढे घेऊन जाण्याचा संकल्प केला.  या उपक्रमात लातूर महिला काँग्रेसच्या वतीने लातूर जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातून प्रत्येकी ३ अशा नागपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष माजी महापौर प्रा. स्मिता खानापुरे, प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस माजी मनपा सदस्या  सौ. सपना किसवे,  माजी मनपा सदस्या वर्षाताई मस्के, माजी जि.प.सदस्या सोनाली थोरमोटे, माजी पंचायत समिती सभापती सौ. शीतल फुटाणे, माजी न.प. सदस्या मंजुषा हजारे अशा ६ महिला प्रतिनिधींचा समावेश होता. देशपातळीवरील सदरील कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या महिला प्रतिनिधींनी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आभार व्यक्त केले आहेत. सदरील उपक्रमात झालेले विचारमंथन जिल्ह्यातील महिलांपर्यंत पोहचविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.  आधुनिक भारताचे शिल्पकार, माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांनी देशात पुरुषांच्या बरोबरीच्या संख्येने असलेल्या  महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले. पंचायतराज व्यवस्था मजबूत करीत असतांना स्थानीक स्वराज्य संस्था कारभारात महिलांना योग्य प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळवून देण्यासाठी त्यांनी निर्णय घेतले. त्याचा परिणाम म्हणून आज देशभरात विविध संस्थांमधून महिला अत्यंत जबाबदारीने काम पार पाडतांना दिसत आहेत. राज्य आणि देशपातळीवर याच पध्दतीने महिलांना प्रतिनिधीत्व दिले जावे  विचार भारतरत्न  राजीवजी गांधी यांचा होता.  त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वतीने दि. २० ऑगस्ट रोजी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडीयम या ठिकाणी महिला राजकीय सक्षमीकरण उपक्रमाचे आयोजन केले होते, या उपक्रमासाठी देशभरातील स्थानीक स्वराज्य संस्थात प्रतिनिधीत्व करणाऱ्या महिला सहभागी झाल्या होत्या. याठिकाणी स्व. राजीव गांधी यांच्या स्वप्नातील भारत आणि त्यातील महिलांचे स्थान या विषयावर अनेक मान्यवर महिलांनी आपले विचार व्यक्त केले. त्यातून स्फुर्ती घेऊन आलेल्या महिला प्रतिनिधी आपआपल्या गावी रवाना झाल्या आहेत.  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विचारातील भारत घडविण्यासाठी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरातील महिला वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वतीने महिला काँग्रेस न्याय वाहिनी स्थापन केली आहे. या माध्यमातून गरजू महिलांना कायदेशीर तसेच आरोग्य विषयक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी १८००२०३०५८९ क्रमांकाची एक टोल फ्री हेल्प्लाइन सुरु करण्यात आली आहे. लातूर जिल्हयातील जास्तीत जास्त महिलांना काँग्रेस पक्षाच्या या महिला न्याय वाहिनीची मदत मिळवून दिली जाईल, असा संकल्प दिल्ली येथील उपक्रमात सहभागी झालेल्या लातूर महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केला आहे.

Post a Comment

أحدث أقدم