प्रा.रामकिशन समुखराव यांच्या असं हे सगळं आत्मचरित्राचे प्रकाशन


 प्रा.रामकिशन समुखराव यांच्या असं हे सगळं आत्मचरित्राचे प्रकाशन



लातूर-क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ(लसाकम)व लहुजी शक्तीसेना जिल्हा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान व प्रा.रामकिशन समुखराव यांच्या असं हे सगळं या आत्मचरित्राचे भालचंद्र रक्तपेढी सभागृह,लातूर येथे माजी प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ.सोमनाथ रोडे हे प्रमुख वक्ते म्हणून लाभणार असून, यावेळी सरस्वती कला महाविद्यालय, किनवटचे प्राचार्य डॉ.आनंद भंडारे व  लेखक-विचारवंत डॉ.भगवान वाघमारे (निलंगा) हे असं हे सगळं या आत्मचरित्रावर भाष्य करणार आहेत. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.राजकुमार मस्के, बळीराम पाटील महाविद्यालय किनवटचे डॉ.सुरेंद्र शिंदे, लसाकमचे मराठवाडा विभागीय सचिव डॉ.सुशीलकुमार चिमोरे आणि नांदेडचे उपविभागीय कृषी अधिकारी डी.एम.तपासकर  यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
        तरी साहित्य व समाजप्रेमींनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लहुजी शक्ती सेनेचे दयानंद कांबळे, लसाकमचे उपाध्यक्ष बालाजी साळुंके, प्रा.बाबासाहेब कांबळे, राम कदम, लक्ष्मण उपडे,दलित मित्र सुरेश चव्हाण, उत्तम दोरवे, ऍड.अंगद गायकवाड, जी.ए.गायकवाड, कवी रमेश हमणंते, रामकुमार रायवाडीकर, डॉ.बी.घाटे, शिवाजी गायकवाड, ऍड.माणिक पवार, मारोती सूर्यवंशी, बी.पी.सूर्यवंशी, अनिल शिंदे, गुरुनाथ मस्के, संभाजी मस्के, नरसिंग घोडके, अशोक तोगरे, संतोष गादेकर, वंदना गादेकर, लिंबराज कांबळे, पंडीत हणमंते, केशव शेकापूरकर, श्रावण मस्के, विठ्ठलराव समुखराव एल.एस.जाधव, दिलीप घोडके, प्रा.सुरेश समुखराव, के.के.मुखेडकर, उत्तम मिसाळ, शिवाजीराव तरोडे, डॉ.बालाजी समुखराव, प्रा.डॉ.शिवशंकर कसबे, धनराज सूर्यवंशी, नरसिंग सांगवीकर,छगन गायकवाड, पी.जी.मोरे, पी.के.सावंत, मारोती कलवले, डी.एम.जगताप, एम.एम.खंडागळे, श्रीमंत गवळी, एस.व्ही. मस्के, बालाजी साबळे, नागनाथ लांेंढे, आर.एन.कसबे, वामन कांबळे, गहिनीनाथ दोरवे,अशोक गवळी, काशिनाथ सगट, माया लोंढे, संतराम मोठेराव, अजय कांबळे, सर्वदिप खलसे, कचरु भडीकर, व्यंकट सरोदे प्रभृतींनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم