दिनेश सोनी यांना सोशल मिडीया क्षेत्रातील डिजीटल इन्फ़्ल्युएन्सर अवार्ड


लातूर/प्रतिनिधी:सोशल मिडीयाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी दै.लोकमतद्वारे देण्यात येणारा "डिजीटल इन्फ़्प्ल्युएन्सर अवार्ड" २०२२ या वर्षासाठी लातूरच्या दिनेश सोनी यांना प्रदान करण्यात आला. इंडीयन टेम्पल्स या इन्स्टाग्राम पेज आणि यूट्यूब चॅनलद्वारे पुरातत्व शास्त्र,पुराणशास्त्र, मुर्तीशास्त्र आणि प्रतिमाशास्त्र या विषयावर केल्या जाणाऱ्या जनजागरण कार्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हेरीटेज या श्रेणीमध्ये दिनेश सोनी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.पुण्यातील जे डब्ल्यू मॅरियट हॉटेल या ठिकाणी आयोजित सत्कार सोहळ्यामध्ये सुर्यदत्ता ग्रुपचे चेअरमन डॉ.संजय चोरडीया यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या प्रसंगी चित्रपट कलाकार सोनाली कुलकर्णी,भाडीपा या चॅनलचे फाऊंडर सारंग साठ्ये आणि पॉला मॅक्लिन,गोयल गंगा ग्रुपचे अतुल गोयल,प्रख्यात युट्युबर आणि इन्व्हेस्टमेंट ॲडव्हाईजर रचना रानडे,प्रख्यात डान्स युट्युबर झैद व अनम दरबार, युट्युबर कृष्णकांत आदींची प्रमुख उपस्थिती होती. दिनेश सोनी हे मागील ३ वर्षांपासून प्राचीन मंदिरांविषयी अभ्यासपूर्ण लिखाण Indian.Temples या इन्स्टाग्राम पेज आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित करीत आहेत.विविध विषयांवर आतापर्यंत त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.यापुर्वी त्यांना या विषयातील संशोधनासाठी ताईवान मधील ताईपेई विद्यापिठाने सन्मानित केलेले आहे.सोबतच त्यांना रोटरी इंटरनॅशनलचा पॉल हॅरीस फ़ेलो आणि ऑस्ट्रेलियामधिल रोटरी क्लबद्वारे रोटरी हिरो अवार्ड हे पुरस्कारदेखील त्यांना प्राप्त आहेत.


Post a Comment

أحدث أقدم