आम आदमी पार्टी कडून लेबर कॉलनी येथे तिरंगा पदयात्रा संपन्न
लातूर - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आम आदमी पार्टी कडून लातूर शहरात लेबर कॉलनी,आनंद नगर, सोफिया मस्जिद संजय नगर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.आपचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली होती.या पदयात्रेमध्ये फटाकेचे आतिश बाजी करण्यात आली.
यावेळी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन सतीश कारंडे यांनी केले होते.या रॅलीला रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कार्याध्यक्ष अमित पांडे,जिल्हा सचिव सय्यद सैईदोदिन, शहर उपाध्यक्ष सचिन औरंगे,भागवत करंडे, सुमित दीक्षित,हरी गोटेकर,अनंदा कामगुंडा, सतीश करंडे,कुमार खोत, गणेश कसबे, मुकेश रपकाळ,सुनिता पाटील,मोहिते पाटील,संजीव उकीरडे,कुमार बिराजदार शेख रफिक आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

إرسال تعليق