मुक्तांगण च्या गोविंदाने फोडली दहीहंडी
लातूर -शहरातील विशाल नगर परिसरातील साई मंदीरा समोरील मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचलित मुक्तांगण इंग्लिश स्कुल मध्ये कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून बाळगोपाळांसाठी दहीहंडी चे आयोजन केले होते.प्रारंभी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन कविता लाटे, शाळेच्या प्रभारी प्राचार्या ममता शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शाळेच्या शिक्षिका शीतल बिरादार यांनी दहीहंडी संदर्भात माहीती दिली. दहीहंडी हा उत्सव कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा करतात. गोपाळकाला कसा बनवायचा याचे प्रात्यक्षिक मुलांना दाखविले. गोविंदा आला रे, गो गो गोविंदा, चांदी की डाल पर सोने का मोर या गीतावर चिमुकल्याणी ठेका धरला. शाळेच्यागोविंदानी मनोरा रचून या श्रेयान जाधव या विद्यार्थ्याने दहीहंडी फोडली. या प्रसंगी कृष्णाच्या
वेशभूषेतअधिराज जाधव, अर्णव महाजन, सार्थक कांबळे, श्लोक कुलकर्णी, समरजीत पाटील, श्रेयांन जाधव, सिद्धांत गुडे, समर्थ कलमे, शिवांश फेरे, शौर्य आचार्य, जय गिर, राघवेंद्र चव्हाण, अवनिष शेडगे,स्वराज जाधव. तर राधाच्या वेशभूषेत अधीरा इस्तळकर, तन्वी कांबळे, ईशान्वी सूर्यवंशी, ईश्वरी जाधव, अक्षिता बरगले, प्रांजला अकुस्कर, स्वरांजली आंबेगावे या विद्यार्थिनी होत्या.या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यानी शाळेच्या वतीने कृष्ण जन्माष्टमीच्या व दहीहंडीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर सर्व बाळ गोपाळांनी गोपाळकाल्याचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेच्या शिक्षिका सीमा मेनकुदळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
.jpg)
.jpg)
إرسال تعليق