गणेशोत्सवाची सुरुवात विधायक कार्याने, समाजोपयोगी कार्याने, स्वच्छता मोहिमेने
लातूर-ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने संविधान चौक ते बजाज शोरूम नवीन बार्शी मार्गावरील दुभाजक पूर्णपणे स्वच्छ करून ३ ट्रॅक्टर केरकचरा, खुरटे गवत काढण्यात आले. याबरोबरच शिवजयंती निमित्ताने लावलेल्या शेकडो शोभिवंत झाडांचे संगोपन कार्य केले.वृक्ष रुपी गणपती मी दगडात नाही,मी देवळात नाही,मी झाडात आहे.हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद समोरच्या पिंपळाच्या झाडाला वृक्ष रुपी गणपतीचा मान देऊन सजवून झाडे लावा, झाडे जगवा, झाडांचे संगोपन करा हा संदेश देण्यात आला.
यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.
إرسال تعليق