पयुर्षण पर्वानिमित्त कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवावीत

                     पयुर्षण पर्वानिमित्त कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवावीत

 

लातूर/प्रतिनिधी: जैन धर्मियांच्या पयुर्षण पर्वानिमित्त शहरातील कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवावीत,असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.जैन धर्मियांच्या वतीने दरवर्षी श्रावण वद्य द्वादशी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी या कालावधीत पयूर्षण पर्व पाळले जाते.या कालावधीत कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवावीतअशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली होती.त्यासंदर्भात महाराष्ट्र शासननगर विकास विभाग यांचे पत्र दिनांक ७ सप्टेंबर २००४ नुसार श्रावण वद्य द्वादशी व भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे.याशिवाय दरम्यानच्या कालावधीत कत्तलखाने व दुकाने बंद ठेवणे समयोचित असल्याने योग्य त्या उपाययोजना करण्याच्या तसेच आपआपल्या क्षेञात मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्यासाठी आवाहन करावे अशा सूचनाही महानगरपालिका व नगरपालिकांना केलेल्या आहेत. संघटनांच्या वतीनेही यासंदर्भात मनपाला निवेदन देऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.त्यानुसार यावर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी अर्थात दि.३१ ऑगस्ट रोजी कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवावीततसेच संपूर्ण पयूर्षन कालावधीत २४/०८/२०२२ ते ३१/०८/२०२२ या कालावधीतही उत्फूर्तपणे मांसाहार विक्री बंद ठेवण्याचे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


        

Post a Comment

أحدث أقدم