मुक्तांगणमध्ये चिमुकल्यांनी केले बाप्पांचे उत्साहात स्वागत

                मुक्तांगणमध्ये चिमुकल्यांनी केले बाप्पांचे उत्साहात स्वागत



 लातूर- विशालनगर परिसरातील श्री साई मंदिरा समोरील मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचलीत मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक उपक्रमांबरोबरच सांस्कृतीक व राष्ट्रीय उपक्रमांना प्राधान्य देवून चिमुकल्यांना त्यांचे महत्व पटवून देण्याचे काम अविरत पणे केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून सर्वांना प्रेरणा देणारा, उत्साहदायी व आनंदमयी वातावरण निर्माण करणारा गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यावेळी चिमुकल्यांनी अतिशय उत्साहात, गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा केली.यावेळी मुक्तांगणच्या चिमुकल्यांनी ढोल ताशांच्या गजरात, गुलाल व पुष्पांची उधळण करत मोठ्या हर्षोल्हासात गणरायाचे स्वागत केले. यावेळी चिमुकल्यांनी ‘‘गणपती बप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया’’ च्या जयघोषाने शाळा व परिसरातील वातावरण मंगलमय करुन टाकले होते.मुक्तांगण बाल गणेश मंडळ या वर्षी 14 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यावर्षी शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थीनींनी त्यांच्या मंडळांच्या कमिटीतील मेंबरची निवड चिठ्ठी उचलून केली. त्यानुसार या बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष आरुष गिरी, पर्व पंजी उपाध्यक्ष राही थडकर, राघव पोतदार सचिव अवनीश शेंडगे, वेदांत शिरसाट, कोषाध्यक्षअनुश्री सोमवंशी व्यवस्थापक वेदांत बरुरे आयोजक अदोक्शय चौहाण, सिद्धीषा कावळे, सहआयोजक अनुराग कांबळे,अद्विका गुडे प्रसिद्धी प्रमुख समर्थ शेटे, स्वराज जाधव यांची निवड करण्यात आली.शाळेच्या परिसरात गणपती बप्पांचे आगमन झाल्यानंतर गणपतीच्या गाण्यावर ठेका धरला व फुलांच्या वर्षाव व मोठ्या जयघोषाने बाप्पांचे स्वागत अतिशय हर्षोल्हासात व आनंदात केले. यावेळी प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण लाटे, कविता लाटे, प्राचार्या सुमेरा शेख, सांस्कृतिक विभाग प्रमुख ममता शर्मा व मुक्तांगण बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष आरुष गिरी, पर्व पंजी यांच्या हस्ते गणरायाच्या मुर्तीची पूजा व मंगल आरती करण्यात आली.             यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थीनींनी अथर्वशिर्षाचे व मंत्रपुष्पांजलीचे पठण केले. याप्रसंगी पालक बहुसंख्येने उपस्थित होते. यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थीनींनी बाप्पांना अभिवादन करुन सर्व विद्यार्थ्यांनी प्रसादघेतला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन ममता शर्मा यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم