लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती शिवणी येथे उत्साहात साजरी

                लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती शिवणी येथे उत्साहात साजरी



औसा :- औसा तालुक्यातील शिवणी बु. येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण, प्रतिमेस पुष्पहारअर्पण,दीपप्रज्वलन महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. 
तुकाराम भाऊराव साठे हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ते एक ख्यातनाम मराठी साहित्यिक होते असेमत महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांनी मांडले 

            अण्णाभाऊंनी विविध साहित्य प्रकार हाताळले, कथा, कादंब-या, पोवाडे, लावण्या, लोकनाटये, पदे, गीते अशी विविध क्षेत्रे त्यांनी सहजगत्या पादाक्रांत केली. आपल्या साहित्यातून शोषण, अन्याय, अत्याचाराला विरोध करणे हेच त्यांनी ध्येय मानले व मानवी वृत्ती, प्रवृत्तीचे वास्तव दर्शन वाचकांना घडविले, शब्दांना अंगाराचे रूप देऊन दलितांच्या निर्जीव मनाला चेतवत अण्णाभाऊ मराठी साहित्यातील अढळ पदावर विराजमान झाले असे मत महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांनी व्यक्त केले .यावेळी युवा सेना उपजिल्हा प्रमुख दिनेश जावळे, भागवत कांबळे, सरपंच किशोर जाधव, उपसरपंच शिवम बुके, लक्ष्मण जाधव, शरद गरड, तानाजी घोडके, ऋषी जाधव,धानोरा सरपंच सुरेश मुसळे जंयती समिती अध्यक्ष रवीराज सुर्यवंशी, आकाश सांळुके, बबलू कांबळे, प्रशांत कांबळे, खंडू कोम्पले आदी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم