जनकल्याण निवासी विद्यालय हरंगूळच्या वतीने शिवलिंग नागापुरे यांचा होणार सन्मान


                        जनकल्याण निवासी विद्यालय हरंगूळच्या वतीने 
शिवलिंग नागापुरे यांचा होणार सन्मान



लातूर-रा. स्व. संघाच्या जनकल्याण समिती(महाराष्ट्र प्रांत) द्वारा संचलित,जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळ ता.लातूरच्या वतीने  शिक्षक दिनाच्या निमित्ताने दि 08 सप्टेंबर 2022 रोजी, जिल्हा परिषद कन्या प्रशाला भादा येथील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवलिंग नागापुरे यांचा  उत्कृष्ट आदर्श शिक्षक म्हणून सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे.या निवडीबद्दलचे पत्र विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे , संस्थेचे विश्वस्त अजय रेणापुरे यांनी शिवलिंग नागापुरे यांच्या घरी भेटून दिले.

Post a Comment

أحدث أقدم