श्रीगणेशाची केशवराज विद्यालयात उत्साहात प्रतिष्ठापना

        श्रीगणेशाची केशवराज विद्यालयात उत्साहात प्रतिष्ठापना


लातूर /प्रतिनिधी:श्री केशवराज माजी विद्यार्थी संघ व श्री केशवराज माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात श्रीगणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. लेझीम पथकाच्या मिरवणुकीच्या माध्यमातून 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात सकाळी श्रीगणेशाचे विद्यालयात आगमन झाले.त्यानंतर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रविण सरदेशमुख यांच्या हस्ते पूजा करून गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी संस्था उपाध्यक्ष जितेश चापसी,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संजय गुरव,केशवराज माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष प्रदीप राऊत,शिक्षक- पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ.अनुराधा दगडगुंडे,सदस्या श्रीमती शुभांगी रूकमे,केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील वसमतकर,उपमुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे आदी मान्यवरांसह पर्यवेक्षक संदीप देशमुख,दिलीप चव्हाण,बबन गायकवाड,पर्यवेक्षिका श्रीमती अंजली निर्मळे तसेच श्री केशवराज शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक,कर्मचारी,विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
    यावेळी लेझीम पथकातील आकर्षक वेशभूषा केलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधले.याप्रसंगी सर्व मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
      या कार्यक्रमासाठी गणेशोत्सव प्रमुख श्रीमती सारिका उद्दे,सहप्रमुख श्रीमती अश्विनी झुंजारे,अभ्यास पूरक मंडळ प्रमुख श्रीमती शैलजा देशमुख,सहप्रमुख श्रीमती करूणा गायकवाड,संस्कार मंडळ प्रमुख श्रीमती अर्चना ठोंबरे, श्रीमती साधना प्रयाग,प्रल्हाद माले, क्रीडा शिक्षक गुरूनाथ झुंजारे,प्रयागराज गरूड,सजावट प्रमुख व्यंकटेश माने यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم