म.न.पा.ने बेकायदेशीरपणे रद्द केलेल्या कराराला न्यायालयाची स्थगिती

                                    म.न.पा.ने बेकायदेशीरपणे रद्द केलेल्या कराराला न्यायालयाची स्थगिती 

 लातूर/प्रतिनिधी:म.न.पा. लातुरने मे. के. एस. तोंडारे टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स यांना दि. 27/07/2021 च्या करारपत्रा आधारे दि. 28/09/2021 रोजीच्या कार्य आदेशान्वये म.न.पा.ला वाहणे पुरवठा करण्याच्या ठेका ई- लिलाव पद्धतीने दिला होता. परंतु गेल्या काही महिन्यापुर्वी लातूर शहर महानगरपालिका मध्ये उपायुक्त पदावर रूजू झालेल्या श्रीमती. विना पवार यांनी मे. के. एस. तोंडारे वाहन पुरवठा ठेकेदार यांनी दि.07/07/2022 रोजी उद्धट वर्तन केले म्हणुन चुकीची तक्रार मा. आयुक्त यांच्याकडे केली त्या वरून म.न.पा. आयुक्त यांनी कोणतेही पुर्व सुचना न देता व चौकशी न करता किंवा कायदेशीर प्रक्रिया पुर्ण न करता दि. 02/08/2022 रोजीच्या आदेश मे. के.एस.तोंडारे यांचा वाहन पुरवठा करण्याचा कार्यआदेश बेकायदेशीर रित्या रद्द केला.म्हणुन ठेकेदार के. एस.तोंडारे यांनी लातूर येथील दिवाणी न्यायालयात दिवाणी दावा क्रं . 586/2022 हा दि.06/08/2022 रोजी दाखल केला सदर दाव्या मध्ये म.न.पा. उपस्थित होऊन त्यांचे म्हणणे दाखल केले तसेच मा. न्यायालयाने दोन्ही पक्षकाराचे म्हणणे ऐकुन घेवून सुनावणी पुर्ण होऊन मा. न्यायमुर्ती आरती शिंदे यांनी म.न.पा.ने दि. 02/08/2022 रोजी रद्द केलेल्या कार्य आदेशला करारनाम्याच्या मुदती पर्यत स्थगिती देवून म.न.पा.च्या मनमानी कारभाराला आळा घातला आहे.ठेकेदार मे. के. एस. तोंडारे यांच्या वतीने जेष्ठ विधीज्ञ व्यंकट बेद्रे यांनी काम पाहिले तर त्यांना ॲड. सुहास बेद्रे, ॲड. सचिन शिंदे, ॲड. गणेश जाधव , ॲड. अजिक्य निंकम, व ॲड. सपना कांबळे यांनी त्यांना सहकार्य केले.

Post a Comment

أحدث أقدم