रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊच्या वतीने इकोफ्रेंडली गणपती कार्यशाळा

रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊच्या वतीने इकोफ्रेंडली गणपती कार्यशाळा



     लातूर/प्रतिनिधी:रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने इकोफ्रेंडली गणपती तयार करण्यासाठी कार्यशाळा संपन्न झाली.
    स्टीम एज्युकेशन कॅम्पस येथे संपन्न झालेल्या या कार्यशाळेस माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती व सजावटीचे साहित्य तयार करण्याच्या हेतूने तसेच नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकता वाढविण्यासाठी आयोजित स्पर्धेत २०० हून अधिक विद्यार्थी आणि तरुणांनी सहभाग घेतला.३ वर्षीय बालकापासून ६८ वर्षीय वृद्धांपर्यंत स्पर्धक यात सहभागी झाले.
   या स्पर्धेत ० ते १० वयोगटात पृथ्वीराज पाटील,११ ते १८  वयोगटात आदित्य कुलकर्णी,१९  ते २५ वर्ष या वयोगटातून वैष्णवी मानकोसकर तर २६ वर्ष वयाहून अधिक वयोगटात निकिता पाटील हे स्पर्धक विजयी झाले.
      रोट्रॅक्ट अध्यक्ष अंकिता बिरनाळे व सचिव शौनक दुरुगकर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अजिंक्य निकम यांनी केले.प्रोजेक्ट चेअरमन अंकेत अन्नदाते,वेदिका गोरे यांच्यासह प्रा.ओमप्रकाश झुरुळे यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.
Attachments area

Post a Comment

أحدث أقدم