राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विविध संघटनातर्फे जाहीर सत्कार व मार्गदर्शन मेळावा संपन्न

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विविध संघटनातर्फे जाहीर सत्कार व मार्गदर्शन मेळावा संपन्न


                 पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांचा सत्कार


औसा/ प्रतिनिधी : -  पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांनी हाश्मी चौक व
बस स्टॅण्ड समोरील अनाधिकृत अतिक्रमण काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून सामान्य जनतेचे अडचण दूर केल्याबद्दल  औसा शहर राष्ट्रवादी पक्षासह ऑटो युनियन, हातगाडे असोसिएशन, भाजी मार्केट असोसिएशन , मोटार मालक चालक संघ व कुरेशी जमात तर्फे जाहीर सत्कार व मार्गदर्शन मेळावा औसा कॅफे हाऊस येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आले असून  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख, तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव  सुलेमान शेख, व  मा. नगराध्यक्ष जावेद शेख, कुरेशी जमातचे अध्यक्ष नसीर कुरेशी, भाजी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष नजीर बागवान, व्यापारी जकाऊल्ला (जे के) बागवान, बागवान बिरादारी समाजांचे उपाध्यक्ष मोईन  बागवान, माजी नगराध्यक्ष मेहराज शेख, माजी पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, ॲटो युनियन शेख शफीक, नबीलाल बागवान फुट व्यापारी, खाजा बागवान तरकारी व्यापारी, अलीम बागवान हातगाडे असोसिएशन, जहुर बागवान, पोलिस मित्र बासिद शेख, यांची उपस्थिती होती. याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा नगराध्यक्ष डॉ अफसर व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव  सुलेमान शेख, मा. नगराध्यक्ष जावेद शेख यांच्या वतीने औसा पोलिस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना औशाचे मा नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्यासह पोलिस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांनी शहरातील वाहतूक संदर्भात मार्गदर्शन व शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे सुचीत केले. यावेळी औसा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अविनाश टिके यांनी केले. याप्रसंगी शहराध्यक्ष ॲड. संतोष औटी, अमर रड्डे, वकील मुस्तफा इनामदार, संगमेश्वर उटगे, तर आभार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲड शिवाजी सावंत यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم