श्री केशव शिशुवाटिकेत दहीहंडी उत्साहात

 श्री केशव शिशुवाटिकेत दहीहंडी उत्साहात 



   लातूर/प्रतिनिधी:येथील श्री केशव शिशुवाटिकेत दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
   भारतीय संस्कृतीत प्रथा- परंपरांना असणारे महत्त्व विद्यार्थ्यांच्या लक्षात यावे,या परंपरा विद्यार्थ्यांना माहीत व्हाव्यात या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. शिशुवाटिकेतील सर्व मुले यासाठी राधा-कृष्णाच्या वेशभूषेत शाळेत आली होती.पंढरपूरच्या दिंडीचे चोपदार राहिलेले अनिरुद्ध सोळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. शिशुवाटिकेच्या मुख्याध्यापिका मंजुषा जोशी यांचीही यावेळी उपस्थिती होती.श्री केशव शिशुवाटिकेच्या अध्यक्षा योगिनीताई खरे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी कार्यक्रम प्रमुख सौ.दुर्गा पाटील व सहप्रमुख प्रज्ञा कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم