दयानंद कला महाविद्यालयात राष्ट्र भक्तांच्या चित्रांचे प्रदर्शन
लातूर- भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हजारो वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी दयानंद कला महाविद्यालयात स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी मोलाचे योगदान दिले अशा देशभक्तांच्या, क्रांतिवीरांच्या व राष्ट्रभक्तांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे भरविण्यात आले. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त दयानंद कला महाविद्यालयात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यात महात्मा गांधी, लोकमान्य टिळक भगतसिंग, पंडित जवाहरलाल नेहरू, सुखदेव, राजगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, लाला लजपतराय, यशवंतराव चव्हाण, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले, स्वामी दयानंद सरस्वती, गोपाळ कृष्ण गोखले, मौलाना आझाद, नेताजी सुभाष चंद्र बोस, दादाभाई नौरोजी, लाला लजपतराय, पंडिता रमाबाई,डॉ राम मनोहर लोहिया, राजर्षी शाहू महाराज, मंगल पांडे, डॉ.एपीजे अब्दुल कलाम,सिंधुताई सपकाळ आदी 75 राष्ट्रपुरुषांचे चित्रे विद्यार्थ्यांनी चितारली.प्रदर्शनीचे उद्घाटन प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे, डॉ संतोष पाटील, डॉ अंजली जोशी, डॉ संदीपान जगदाळे, डॉ. बालाजी घुटे, डॉ.अशोक वाघमारे, प्रा.विलास कोमटवाड,प्रा.महेश जंगापल्ले अधीक्षक नवनाथ भालेराव, बालकिशन अडसूळ आधी प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.आदित्य कुलकर्णी, मानसी भोईबार,वैष्णवी कमळे,अर्षद सय्यद, हरिदास गुंजलवाड, प्रत्युक्ष नाईक, अनुराग कांबळे इत्यादी विद्यार्थी चित्रकारांनी या प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

إرسال تعليق