एक जगाला जागवणारा आणि दुसरा जगवणारा अशा दोन दात्यांच्या स्मृतींना शिवरत्न पुरस्कारामुळे उजाळाह.भ.प. अवधुत महाराज एकंबेकर

 एक जगाला जागवणारा आणि दुसरा  जगवणारा अशा दोन दात्यांच्या स्मृतींना  

    शिवरत्न पुरस्कारामुळे उजाळाह.भ.प. अवधुत महाराज एकंबेकर


लातूर - जगाला जागवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत.त्यांनी रयतेतल्या सर्वसामान्या माणसाला जाग केल प्रजेच्या कल्याणासाठी  स्वराज्य निर्माण करून जगासमोर मोठा आदर्श ठेवला हे कोणीही विसरू शकत नाही आणि विलासराव देशमुख यांनी चौफेर विकास करून जनतेला स्वताच्या पायावर उभं राहुन जगायला शिकवलं हे सर्वोत्तम उदाहरण आपल्या सर्वापुढे आहे   प्रत्येक क्षेत्रातील वेक्तीचां पुरस्कार देऊन गौरव केला जातो.शिवाजी महाराज यांच्या नावाचा व विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमीत्त लातूर मिशन वृतपत्र सामाजीक दायित्व सतत  पार पाडत असते.यामुळेच खर्या अर्थाने त्याच्या स्मृतीस उजाळा मिळत आहे असे मत शिवरत्न पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा प्रसंगी हभप अवधुत महाराज एकंबेकर अध्यक्षीय भाषणात म्हणाले सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवराचे अभिनंदन केले.
लातूरचे नाव इतिहासाच्या पानावर कोरले गेले -अभिजीत देशमुख
विलासराव साहेबामुळे व सर्वसामान्याच्या झालेल्या प्रगती मुळे लातूरची ओळख वेगळीच झालेली आहे हे विसरता येणार नाही जगाच्या नकाशावर व इतिहासाच्या पानावर लातूरचे नाव  कोरलं गेल आहे लातूर मिशन वृतपत्राने वेगळा ठसा उमटवुन
बर्‍याच वर्षांपासुन दरवर्षी  पुरस्कार वितरणाचे कार्य करत आहे हे अखंड पणे चालावे असे अभिजीत देशमुख आपल्या भाषणात म्हणाले..

शिवरत्न पुरस्काराची ऊंची खुप वाढलेली-संतोष सोमवंशी उपसभापती
गेल्या बर्‍याच वर्षांपासून शिवरत्न पुरस्कार वितरण सोहळा पाहतोय लातूर जिल्ह्य़ात एकमेव वृतपत्र आहे प्रशासनासह विविध क्षेत्रातील कर्तबगार वेक्तीचा गौरव करते इच्छा शक्ती असेल तर काय पण होऊ शकते एवढा देखना सोहळा घेऊन एक आदर्श निर्माण केला यामुळेच शिवरत्न पुरस्काराची ऊंची खुप वाढलेली आहे असे मत संतोष सोमवंशी उपसभापती महाराष्ट्र बाजार समीती यांनी मांडले


विलासराव साहेबांच्या विचारांची परंपरा आपण पुढे घेऊन जाताय-स्मीता खानापुरे माजी महापौर
मी महापौर असताना वृतपत्राची सुरवात झाली विलासराव साहेबाच्या विचार हे सर्वाना दिशा व प्रेरणा देणारे आहेत त्याचा वारसा आपण सर्वानी जपला पाहिजे अशा कार्यक्रमातुन त्यानी केलेल्या कामांना खरोखर ऊजाळा मिळतो हे काम खुप मोठ आहे भविष्यात पण निरंतर शिवरत्न पुरस्कार वितरण सोहळा चालु रहावेत अशा शुभेच्छा स्मीता खानापुरे  यांनी दिल्या .पुरस्कार देऊन बहुमान केल्यामुळे वेक्तीच वेगळ महत्त्व प्राप्त होते

गजानन भातलवंडे पोलिस निरीक्षक  स्था.गु.शा.लातूर
समाजात वावरत असताना कार्य करताना एखादी कौतुकाची थाप पाठीवर मिळाल्यास वेगळीच उर्जा मिळते उत्साह वाढतो पुरस्कारामुळे त्या वेक्तीच्या जीवनाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते हा तर शिवरत्न पुरस्कार आहे. याचे महत्त्व व ऊंची खुप मोठी आहे असे पुरस्काराला उतर देताना गजानन भातलवंडे म्हणाले .


शिवरत्न पुरस्कार प्राप्त मान्यवरांची काम करण्याची जबाबदारी आणखी  वाढली-
भारत जाधव अध्यक्ष शिवदर्शन फाऊंडेशन

दरवर्षी समाजात व प्रशासनात उत्कृष्ट काम करणाऱ्या वेक्तीना शिवरत्न पुरस्काराने गौरवण्याचा योग येतो त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने व विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी दरवर्षी या निमित्ताने तेवत रहातात या हेतुने शिवरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो  अनाथ व गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन लातूर मिशन वृतपत्राचा वर्धापन दिन व स्मृतीदिन साजरा होतो पुरस्कार प्राप्त मान्यवराची आणखी समाजात जबाबदारी वाढली आहे असे  प्रस्तावित भाषणात भारत जाधव म्हणाले,कार्यक्रमास  सर्जेराव मोरे चेअरमन रेणा कारखाना,सुमित वाघ उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते.या वेळी शिवरत्न पुरस्कार बाबु खंदाडे सरपंच गंगापुर ,दतात्रय गिरी उपमुख्य कार्य अधिकिरी जि प लातूर, गजानन भातलवंडे पोलिस निरीक्षक, सुधीर देशमुख  नायब तहसीलदार  लातूर, रोहन जाधव  उपअभियंता लातूर,चिराग सेनमा संचालक आयायबी , डाॅ धर्मवीर भारती  बांधकाम क्षेत्र , नागनाथ खंदाडे मंडळ अधिकारी , विलास मलिशे अव्वल कारकुन, गोकर्णा जाधव ग्रंथपाल यांना पुरस्कार देऊन प्रमुख पाहुण्याच्या हास्ते गौरविण्यात आले तसेच अनाथ व गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन तानाजी घुटे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी परमेश्वर घुटे उपसंपादक सुरेश काचबावार कार्यकारी संपादक , श्रीराम गायकवाड, दयानंद माने,  प्रा बालाजी वाघमारे, अमित तिकटे,  कैलास ढोले गोविंद जगताप,  दीपक बोराडे  , बालाजी कांबळे,  अॅड नामदेव शिंदे ,विष्णु शिंदे  , महेश राठोड  ,सादिक शेख ,श्रीमंत होळे , अजित दुटाळ ,मंगेश आडे,तुकाराम जोगदंड,दिपक शिंदे,ओमकार सरडे, ऋषिकेश मोरे,संपत भिसे , अमर जाधव,  सुरज मगर ,गणेश भोसले,  प्रदिप पटाडे सोपान जाधव,दयानंद स्वामी, उमेश भिसे, ईश्वर पानढवळे या सह महिला, प्रशासनातील अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव, मित्रपरिवार  मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم