आंतरराष्ट्रीय दर्जाचा सोयीसुवीधानीयुक्त पथदर्शी प्रकल्प-माजी मंत्री आमदार अमित देशमुख

आंतरराष्ट्रीय दर्जाचा सोयीसुवीधानीयुक्त पथदर्शी 

प्रकल्प-माजी मंत्री आमदार अमित देशमुख


 

 

लातूर (प्रतिनिधी )लातूर शहरातील मुख्यमार्गाला पर्यायी रस्ता म्हणून बांधण्यात येत असलेल्या विलासराव देशमुख मार्गाच्या कामांची पाहणी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री  लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मंगळवार दि१६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी पाहणी केलीमिनी मार्केट ते शिवाजी चौक दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे कामासाठी १४ कोटी ४५ लाख ५६ हजार रूपये खर्च होणार असून लातूरच्या वैभवात भर टाकणाऱ्या या मार्गाचे काम अत्यंत दर्जेदार पध्दतीने करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

   महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तरया योजनेतून लातूर शहरातील अत्यंत महत्वाचा असलेला विलासराव देशमुख मार्ग नव्याने बांधण्यात येत आहेलातूर शहरातील वाढती रहदारी आणि त्यामूळे मुख्यमार्गावर होत असलेल्या ट्राफीक जामची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी हा पर्यायी मार्ग नव्याने बांधण्याचा निर्णय तत्कालीन पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांनी घेऊन त्यातील मिनी मार्केट ते शिवाजी चौक या पहिल्या टप्प्यासाठी जवळपास १५ कोटींचा निधी मंजूर केला होतात्या महामार्गाचे काम सुरू झाले असून मंगळवारी सकाळी या कामांची पाहणी त्यांनी केलीहा मार्ग लातूर शहराच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा आहेत्यामूळे कंत्राटदार  सार्वजनीक बांधकाम विभागाने अत्यंत काळजीपूर्वक नियमानूसार दर्जेदार पध्दतीने काम करावे अशा सुचना त्यांनी केल्या.


आंतरराष्ट्रीय दर्जाचा सोयीसुवीधानीयुक्त पथदर्शी प्रकल्प

लातूर शहराच्या मधोमध बांधण्यात येत असलेल्या या विलासराव देशमुख मार्गावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सोयीसुवीधा उभारण्यात येणार असून तो महाराष्ट्रातील एक पथदर्शी मार्ग म्हणून नावारूपाला यावा अशी माजी मंत्री आमदार आमदार अमित देशमुख यांची संकल्पना आहेसदरील रस्ता एकूण १५ मीटर रूंद चारपदरी रस्ता आहेरस्त्याच्या दक्षीणेला पब्लीक प्लाजा असून या ठिकाणी वाचनकटटेवायफायविश्राती थांबे  खादय पदार्थाची सोय आदी सुविधा होणार आहेतवयोवृध्दासाठीलहानमुलांसाठी या ठिकाणी अनेक सुविधा उभारल्या जाणार आहेतरस्त्याच्या ऊत्तर बाजूस वॉकीग आणि सायकल ट्रॅकची उभारणी होणार आहेया मार्गावर बस आणि रिक्षा स्टॅड उभारणी तसेच स्वतंत्र पार्कीगचीही व्यवस्था करण्यात येणार आहेया मार्गावर प्रभावी सिग्नल यंत्रणा उभारली जाईलया ठिकाणची ड्रेनेज  विजवाहीन्याची व्यवस्था जमीनीखालून असेलत्याच बरोबर रस्त्याच्या कडेला  दुभाजकात आकर्षक वृक्षांची लागवड केली जाणार आहे.

 यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधवलातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेलविलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुखवैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष डोपेडॉमहादेव बनसोडेडॉशालिनी सांगळेडॉ.ब्रिजेश बाचपल्लेमाजी नगरसेवक युनूस मोमीनसार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठउपअभियंता रोहन जाधवउपअभियंता विजय सोनटक्केशाखा अभियंता विजय आवाळेसिकंदर पटेलप्रवीण सूर्यवंशीदिनेश गोजमगुंडेबालाजी झिपरे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

أحدث أقدم