एड्स जनजागृती अभियान शिबीरात दयानंद कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी केली ऐच्छीक चाचणी


लातूर  : आंतर राष्ट्रीय युवा दिनानिमित्त येथील दयानंद कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना  विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने एचआयव्ही एड्स जनजागृती अभियान राबविण्यात आले. तसेच यावेळी घेण्यात आलेल्या तपासणी शिबीरात १०७ विद्यार्थ्यांनी ऐच्छिक चाचणी केली.युवा वर्ग हा एचआयव्ही/एड्स संदर्भात अधिक संवेदनशील असून या निमित्ताने युवा वर्गामध्ये एचआयव्ही/एड्स संदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे. युवा वर्ग सृजनशील असल्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यात जागरुकता निर्माण व्हावी यासाठी  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड,  उपप्राचार्य  डॉ. प्रशांत मान्नीकर, एनएसएस प्रभारी डॉ. सुभाष कदम, डॉ. सुनिता सांगोले, डॉ विलास कोमटवार, वैद्यकीय महाविद्यालयाचे समुपदेशक अरुणकुमार गवळे, लॅब टेक्नीशियन लीना सुभाष प्रसाद पांडे यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यपापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.

Post a Comment

أحدث أقدم