गणेश मंडळांनी प्रत्येकी शंभर झाडांचे वृक्षारोपण करावे-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 गणेश मंडळांनी प्रत्येकी शंभर झाडांचे वृक्षारोपण करावे-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 लातूर- लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षाप्रमाणे गणेशात्सव 2022 साजरा करण्यात येणार आहे. दिनांक 31 ऑगस्ट, 2022 रोजी पासून गणेशोत्सव सुरु होणार आहे. श्रीगणेश स्थापनेची परवानगी पोलीस विभागाकडून दिली जाते. सदर गणेशोत्सव कालावधीमध्ये अनेक गणेशमंडळ समाज प्रबोधनाच्या विविध उपक्रमांचे 

(उदा. रक्तदान शिबीर,देखावे इत्यादी) आयोजित करतात.

लातूर जिल्ह्यातील अत्यल्प वनक्षेत्र व नेहमीचे कमी प्रमाणातील पर्जन्यमान विचारात घेता जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याची नितांत गरज आहे. यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मदतीने मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड केली जावू शकते. त्यामुळे इतर उपक्रमांप्रमाणे यावर्षीपासून एक नवीन उपक्रम म्हणून गणेशोत्सव कालावधीमध्ये सार्वजनिक गणेश मंडळाकडून त्यांच्या सोयीच्या व योग्य ठिकाणी प्रत्येकी किमान शंभर झाडांचे वृक्षारोपण करुन घेण्याचे जिल्हा प्रशासनाकडून ठरविण्यात आले आहे.

ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध नाही, अशी गणेश मंडळे, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या ठिकाणी ( महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत) वनविभाग, शाळा महाविद्यालयाची मैदाने, रस्ता दुतर्फा, नदी वृक्ष लागवड करुन शकतात.

या उपक्रमान्वये वृक्षारोपण केल्याचे पुरावे (तलाठी प्रमाणपत्र, वनविभाग अधिकारी यांचे प्रमाणपत्र) सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रीगणेश स्थापनेच्या परवानगीसाठी अर्ज करतांना सोबत जोडावे.

पोलीस विभागाने गणेश मंडळांना परवानगी देतांना गणेश मंडळाकडून प्रत्येकी किमान 100 झांडांचे वृक्षारोपण करुन त्यांचे संगोपन करावे, अशी सुचना परवानगी पत्रकावर नमूद करावी. तसचे दरवर्षी परवानगी देतांना पुर्वी लावलेल्या किमान शंभर झाडांचे वृक्षारोपण व संगोपन केल्याचा पुरावा, घ्यावा असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم