पोळा सण उत्साहात साजरा, ढोल- ताशासह पशुधनाच्या मिरवणूका, शेतकरी आनंदी

                    पोळा सण उत्साहात साजरा, ढोल- ताशासह पशुधनाच्या मिरवणूका, शेतकरी आनंदी





औसा /प्रतिनिधी -औसा तालुक्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल-ताशासह वाजत गाजत बैल मिरवणूक गावोगावी काढण्यात आल्या. भारतीय संस्कृतीत ऋतूनुसार वेगवेगळे सणाचे महत्त्व आहे  शेतकरी वर्गात आकर्षणाचा उत्साह भरणारा हा सण आहे. नवनवीन तंत्रज्ञानामुळे या बैलाचे शेतातील अस्तित्व हळूहळू कमी होत आहे. तरीही अगदी आपल्या मुलाप्रमाणे बैलाची काळजी घेतली जाते. बैलांची छान सजावट करून  रंगीबेरंगी झुली अंगावर टाकून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. तालुक्यात बैल जोडी घेऊन स्पीकर, डीजे लावून गावातून एकच वेळी मिरवणुका करण्यात आल्या. घरातील महिलांनी बैलाची पूजा करून पोळी खाऊ घालून तसेच लाऊडस्पीकर लावून विवाह सोहळा करण्यात आला  यासाठी घरातील प्रत्येक व्यक्ती कामाला लागले. लहान मुले तर खूपच अगदी आनंदी होते. बैलांना धुवून, नवीन झुली पाठीवर सजवून शिंगांना नवीन रंग त्यावर फुगे लावून मिरवणूक काढण्यात आली. तालुक्यात जवळपास 90 % शेती जरी यांत्रिकी पद्धतीने झाली असली तरी बैलाचे महत्त्व कमी झालेले नाही. कारण बैलपोळा आजही मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा केला.

Post a Comment

أحدث أقدم