पी.एम. किसान योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी

                    पी.एम. किसान योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी

 

लातूर- केंद्र शासनाच्‍या निर्देशानुसार ज्‍या लाभार्थ्‍यांचे (ekyc) ई-केवायसी  होणार नाही त्‍या लाभार्थ्‍यांना पीएम किसान योजने‍च्‍या पुढील हप्‍त्‍याचा लाभ मिळणार नाही अशा सुचना प्राप्‍त झाल्‍या आहेत. तरी लातुर जिल्‍हयातील पी.एम किसान योजनेसाठी पात्र शेतक-यांना आवाहन करण्‍यात येते कि, ज्‍या लाभार्थी शेतक-यांनी (ekyc) ई-केवायसी  प्रमाणिकरणाची प्रक्रिया पुर्ण केलेली नाही अशा पात्र लाभार्थी शेतकरी यांनी सदर प्रक्रिया  दि. ३१ ऑगस्‍ट २०२२ पुर्वी  पुर्ण करण्‍यात यावी.  असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

केद्र शासनाकडून ग्राहक सेवा केद्र (CSC) सीएससी केंद्रावर बायोमॅट्रीक पध्दतीने (ekyc) ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रीकरण दर रुपये 15/- निश्चित करण्यात आला आहे. पी.एम. किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पूढील एप्रिल-जुलै 2022 या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापुर्वी (ekyc) ई-केवायसी  प्रमाणिकरणाची प्रक्रिया दि. 31 मार्च 2022 पुर्वी पुर्ण करणे बाबत यापुर्वीच सुचित करण्यात आले होते. त्याअनुषंगाने लातूर जिल्ह्यातील एकुण 3 लाख 14 हजार 588 लाभार्थ्यांपैकी 1 लाख 96 हजार 816 लाभार्थ्यांनी (ekyc) ई-केवायसी प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केली असून अद्यापही 117722 लाभार्थ्यांची ekyc प्रमाणिकरण करणे शिल्लक आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत्‍ लातूर जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना खालील प्रमाणे (ekyc) ई-केवायसी व (OTP) ओटीपी किंवा बायोमॅट्रीक प्रणालीव्दारे करण्यासाठी पर्याय पोर्टलवर उपलब्ध करुन दिलेली असून त्यामध्ये संबंधित लाभार्थी शेतकरी यांनी पी.एम. किसान योजनेचा https://pmkisangovin या वेबसाईटवरील (Farmer Corner) फार्मर कॉर्नर  या टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान ॲपव्दारे (OTP) ओटीपी  व्दारे लाभार्थ्यांना स्वत: ekyc प्रमाणिकरण मोफत करता येईल. तसेच ग्राहक सेवा केद्र (सीएससी) केद्रावरती (ekyc) ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रीक पध्दतीने करता येईल.

Post a Comment

أحدث أقدم