माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमीत्त वृक्षारोपण
लातूर (प्रतिनिधी) माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमीत्त लातूर तालुक्यातील टाकळी शि. ग्रामपंचायत येथे अभिवादन करण्यात आले] तसेच स्मृतिदिनानिमित्त माजी सरपंच गणेश ढगे यांच्या मार्फत गावांतर्गत मुख्य रस्त्याच्या बाजूस 100 नारळाच्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित सरपंच महानंदा काशिनाथ काळे,उपसरपंच सईन झेठे, सोसायटीचे चेअरमन संतोष दगडे पाटील, सोनेराव झेटे, ज्ञानोबा कदम, राजाभाऊ कदम, बब्रुवान बचाटे दिलीप कदम आबासाहेब कदम, शंकर सावंत प्रकाश सावंत, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेख सर,कोळी सर, राठोड मॅडम, अड्सुळे सर, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

إرسال تعليق