गणेशोत्सवानिमित्त 111 गणेश भक्तांचे रक्तदान

                     गणेशोत्सवानिमित्त 111 गणेश भक्तांचे रक्तदान

कै. गिरीश साळुंके गणेश मंडळ व श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढीचा उपक्रम


  

लातूर– गणेशोत्सवा निमित्त प्रकाश नगर येथील राजा कै. गिरीश साळुंके सार्वजनिक गणेश मंडळ व  एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 111 गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात रक्तदान करुन आपली गेल्या 17 वर्षाची परंपरा कायम राखली आहे.सन 2006 मध्ये प्रकाश नगर येथे चंद्रकांत साळुंके यांच्या पुढाकारातून प्रकाश नगरचा राजा कै. गिरीश साळुंके सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली. गेल्या 17 वर्षापासून गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेवून हे गणेश मंडळ सामाजिक दायित्वभाव जपत आहे. दरवर्षीची रक्तदानाची परंपरा कायम राखत या गणेश मंडळातील सर्व गणेश भक्तांनी पुढाकार घेवून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करुन 111 गणेश भक्तांनी रक्तदान करीत सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम केले असून गेल्या 17 वर्षात तब्बल अडीच हजार दात्यांनी रक्तदान केले आहे. या मंडळाच्या सामाजिक योगदानाची दखल घेवून दिशा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अभिजित देशमुख, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, जि. प. चे माजी अध्यक्ष संतोष देशमुख यांनी मंडळातील सर्व संयोजकांचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.या रक्तदान शिबिरात श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढीच्या रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सौ. मिना सोनवणे, डॉ. बी. डी. दाताळ, रक्तसंक्रमण तंत्रज्ञ गोविंद गिराम, मकरंद कुलकर्णी, विकास करंजे, अर्जुन वाघचौरे, रामदास चिलमे, वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता अशोक जानराव, लिपीक अच्युत पाटील, सेवक विश्वनाथ कराड यांनी सेवा बजावली.या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी कै. गिरीश साळुंके सार्वजनिक गणेश मंडळाचे संस्थापक चंद्रकांत साळुंके, अध्यक्ष बिभिषण सांगवीकर, उपाध्यक्ष सुरेश यादव, रामदास सारगे, मोहनराव भालके, शिवा बदनाळे, राजू सुतार, शशिकांत सांळुके, बस्वराज रेकुळगे, धनंजय मुळे, श्रीधर साळुंके, मनोज येदले, राजेंद्र सराफ, गणेश इंगळे, दिलीप कुलकर्णी, बप्पा माळी, शुभम चिंतलचेरे, मोहसिन शेख, अंकुश कदम, रोहन पवार, बालाजी रत्नपारखे यांच्यासह अनेक गणेशभक्तांनी परिश्रम घेतले.

               

Post a Comment

أحدث أقدم