खासदार निधीतुन 42 लाखांच्या विकासकामांचा लातुरमध्ये शुभारंभ


खासदार निधीतुन 42 लाखांच्या विकासकामांचा लातुरमध्ये  शुभारंभ







(लातुर-प्रतिनिधी)--
लातुर शहरातल्या विविध नगरांमधील रस्ते ,नाल्या बरोबरच बोअरवेल साठी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या  विकास निधीतून देण्यात आलेल्या 42 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ खासदार सुधाकर  शृंगारे यांच्या हस्ते करण्यात आला. आनंद नगर येथे झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे,प्रेरणाताई होणराव, मनिष बंडेवार, ललित तोष्णीवाल, मुन्ना हाश्मी, विजयकुमार अवचारे, संजय सोनकांबळे, अंगद भोसले, बाबा गायकवाड, किसन बडे, लाला सुरवसे आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.---आनंद नगर येथे रस्ते व नाल्यांच्या बांधकामासाठी 10 लाख रुपये, महादेव नगर येथील रस्ता व नाल्यांच्या बांधकामासाठी 20 लाख रुपये, बौद्ध नगर- साळी गल्ली 10 लाख रुपये, ताजोद्दीन बाबा दर्गाह येथे बोअरवेल साठी अडीच लाख रुपये असा खासदार निधी मंजूर करण्यात आला असून या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे.-- जिल्ह्याच्या विकासकामांसाठी खासदार सुधाकर शृंगारे हे आग्रही असून केंद्र सरकारच्या माध्यमातून शेकडो कोटींचा निधी लातुर जिल्ह्याला मिळाला आहे. पाणी,रस्ते ,वीज यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न खासदार सुधाकर शृंगारे यांचा आहे. यावेळी बोलताना खासदार सुधाकर शृंगारे यांनी विकास कामांमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण येणार नाही. कामांना प्राधान्य देऊन लोकांच्या सुविधांवर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. टेम्भुर्णी-लातुर, लातुर-नांदेड, लातुर शहरा लगतचा गरुड चौक ते रेणापूर नाका महामार्ग ,यासाठी  खासदार सुधाकर शृंगारे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

Post a Comment

أحدث أقدم