कोविड लसीकरण लकी ड्रॉ मधील विजेते

                     कोविड लसीकरण लकी ड्रॉ मधील विजेते

लातूर-स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव” अंतर्गत शहरातील कोविड-१९ आजारापासून संरक्षण प्राप्‍त व्‍हावे यासाठी व लसीकरणाचे विशेषत: प्रिकॉशन डोसचे प्रमाण वाढावे व नागरिकांना लसीकरण करून घेण्‍यासाठी प्रोत्‍साहन मिळावे यासाठी १५ ऑगस्‍ट स्‍वातंत्र्य दिनापासुन ते ३० सप्‍टेंबर २०२२ या कालावधीत लसीकरण करून घेणा-या शहरातील नागरीकांसाठी विशेष बक्षीस योजना राबविण्‍यात येत आहे.

याअंतर्गत एकूण ७५ विजेते लाभार्थी निवडण्‍यात येणार असून प्रत्‍येक विजेत्‍या लाभार्थ्‍यास रू. १०००/- रोख बक्षीस देण्‍यात येणार आहे. प्रत्‍येक अठवड्यास १० विजेते निवडण्‍यात येणार आहेत.

तरी दि. १५ ते २०.०८.२०२२ तसेच दि. २२ ते २७.०८.२०२२ या कालावधीत शहरातील लसीकरण केंद्रावर लस घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांमधुन प्रत्‍येक आठवड्रयास १० याप्रमाणे पहील्‍या दोन आठवड्यातील एकूण २० लाभार्थ्‍यांची लकी ड्रॉ सोडतीद्वारे निवड करण्‍यात आली आहे.

 तरी विजेते लाभाथ्‍यांचे नाव,पत्‍ता पुढील प्रमाणे आहेत. अलीमुनबी बशीर शेख महादेव नगर, ज्योती संपतराव जगदाळे इंडिया नगर,शोभा प्रल्हाद पांचाळ नारायण नगर,बनशेळकीकर विनया सुधीर शारदा नगर,मारुती प्रल्हादराव बाघे भोई गल्ली,आशा प्रभाकरराव पोलकर मळवटी रोड,शिवकल्याणी शिरीष गारटे मुक्ताई नगर,अजय चिलकेवार सुतमिल रोड,प्रभा अंगद गुट्टे मंत्री नगरस्वाती हेमंत धर्माधिकारी देशपांडे गल्ली,अनुसया नामदेव नरहरे दीपज्योती नगर,विशाल बाबासाहेब ओव्हाळ बौद्ध नगर,राऊतराव करण प्रभू खरोसा,प्रकाश गोविंदराव बंडापल्ले ,वैष्णवी सतीषराव टाकेकर व्यंकटेश नगर,श्रावणी सदानंद महती श्रीकृष्ण नगर,नागनाथ गोविंद दिवटे श्री नगर,शिवकन्या प्रभाकर साखरे बजरंग चौक,शितल किशोर वाघमारे गांधी नगर,संगीता प्रदीप देशमुख आदर्श कॉलनी तरी विजेत्या लाभार्थ्यांनी दि.०७.०९.२०२२ रोजी मा.उपायुक्त यांचे कार्यालय, महानगरपालिका मुख्‍य कार्यालय, मेन रोड लातूर येथे आधारकार्डची मुळ प्रत व एक झेरॉक्स प्रतिसह उपस्थित रहावे,व आपले रोख बक्षीस घेवून जावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.




Post a Comment

أحدث أقدم